आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्यापुरात "नाफेड'च्या तूर खरेदीचा शुभारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - हरभरा,सोयाबीन आणि कापूस या तीनही शेतमालाचे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत ‘फुटाण्याचे’ असताना मागील दोन दिवसांत तुरीचेही दर ६०० ते ८०० रुपयांनी घसरले होते. दरम्यान, शनिवारी (दि. २३) ‘एफसीआय’ने लिलावात प्रथमच मुसंडी मारून चढ्या दराने बोली बोलून तूर कमाल ९२०० तर किमान ९१०० रुपयांनी खरेदी केली. या लिलावाचा परिणाम जिल्ह्यातील इतर बाजारपेठेवर झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा आज समाधानकारक भाव मिळाले.
जिल्ह्यात सोयाबीनचे पीक हातातून गेल्यानंतर कोरडवाहू पट्ट्यात तुरीचे सरासरी एकरी एक ते तीन पोते तर बागायत पट्ट्यात एकरी सहा ते दहा पोते तुरीचे उत्पादन होत आहे. अशा स्थितीत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील दोन दिवसांत तुरीच्या दरात ६०० ते ८०० रुपयांनी घसरण झाली होती. त्यामुळे एकमेव आशेचा किरण असणाऱ्या तूर उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. दरम्यान, बाजार समितीमध्ये भारतीय खाद्य निगमच्या (एफसीआय) खरेदीमुळे बाजारात स्पर्धा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळत होते. परंतु, आतापर्यंत एफसीआय लिलावात सहभागी झाल्यामुळे इतर खरेदीदारांनी बोललेल्या बोलीपेक्षा कमी दरातच तुरीची खरेदी करावी लागत होती. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे पाहून शनिवारी एफसीआय जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी सकाळी दहा वाजता लिलावात भाग घेतला. यात एफसीआयने सर्वाधिक ९२०० रुपयांची बोली बोलून प्रथम विजय हरणे या शेतकऱ्याची १२ पोते तूर खरेदी केली. एफसीआयने ९१०० रुपये किमान दराने तुरीची खरेदी केली. एफसीआयच्या वतीने आज सुमारे ८०० पोत्यांची खरेदी करण्यात आली. या वेळी एफसीआयचे तांत्रिक व्यवस्थापक प्रशांत काळबांडे, एस. एन. तेलखडे, उमाकांत धापटे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी अशोक देशमुख, सहायक जिल्हा मार्केटिंग व्यवस्थापक रमेश पाटील यांची उपस्थिती होती.

लिलावात एफसीआयचा प्रथमच सहभाग : येथीलकृषी उत्पन्न बाजार समितीत एफसीआयच्या वतीने १८ डिसेंबरपासून खरेदीला सुरुवात करण्यात आली. परंतु, लिलावाच्या अडथळ्याच्या शर्यतीमुळे एफसीआयच्या अधिकाऱ्यांना भाग घेता येत नव्हता. त्यामुळे बाजारातील स्थानिक खरेदीदारांनी लिलावात ‘सोयीने’ घोषित केलेल्या भावातच खरेदी करावी लागत होती. याचा परिणाम तुरीचे भाव पडून शेतकऱ्यांना बेभाव तुरीची विक्री करावी लागत होती. दरम्यान, आज एफसीआयने तुरीच्या लिलावात भाग घेऊन तुरीचे दर ९२०० रुपयांपर्यंत वाढवले. त्यानंतर स्थानिक खरेदीदारांनी कोणतीच बोली बोलल्यामुळे ९२०० रुपये भाव अंतिम ठरवण्यात आले.

प्रमुखबाजारपेठेतही भाव सुधारले :
विदर्भातीलदुसऱ्या क्रमांकाच्या येथील बाजार समितीत तुरीचे दर घसरल्यानंतर दर्यापूर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे या बाजार समित्यांमध्येही घसरण झाली होती. अमरावती बाजार समितीत तुरीचे दर वधारल्यानंतर इतर बाजार समित्यांमध्येही दरात वाढ झाल्याचे आज दिसून आले.

बाजारभावाप्रमाणे व्हावी एफसीआयकडून खरेदी
^एफसीआयने बाजारभावाप्रमाणे खरेदी करावी. त्यांच्या वतीने किमान दोन-तीनशे पोत्यांची खरेदी केली जाते. यात इतर शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी एफसीआयने किमान हजार दोन हजार पोती खरेदी करावी. सतीश अट्टल, संचालक,कृउबा.

अडचण नाही
^खरेदीदारांना एफसीआयच्या खरेदीमुळे अडचण नाही. आहे त्या बोलीपेक्षा खरेदीदारांनीही अधिक बोली बोलावी. दीपक जाजू, अध्यक्ष,धान्य खरेदीदार असोसिएशन.

दररोज बोली बोलणार
^बाजारसमितीतदररोज होणाऱ्या लिलावात एफसीआयच्या वतीने सकाळी बोली बोलली जाणार आहे. अशोक देशमुख, जिल्हामार्केटिंग अधिकारी .

एफसीआयचे भाव
बाजारसमिती किमान कमाल
धामणगाव रेल्वे ८५०० ९३००
अमरावती ९१०० ९२००
बाजारसमितीतील भाव
दर्यापूर६००० ९२२५
चांदूर रे. ८००० ९०००
मोर्शी ८२०० ८८००