आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वायुसेनेच्या हवाई कसरतींचा थरार, तरुणांना आकर्षित करण्याच्या उद्देश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- फुटाळा तलावाच्या चौपाटीवर भाविक बाप्पाला निरोप देत असतानाच शेजारीच असलेल्या वायुसेनानगरातील आकाशात रविवारी २७ सप्टेंबरला सकाळी वायुसेनेच्या जाबाज पथकांच्या चित्तथरारक हवाई कसरती रंगल्या होत्या. हजारो नागपूरकरांनी हवाई कसरतींचा थरार डोळ्यात साठवून ठेवला.

वायुसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जवळपास दरवर्षीच नागपुरात हवाई कसरतींचे आयोजन होत असते. संरक्षण दलांमध्ये अधिकाऱ्यांची कमतरता लक्षात घेऊन तरुणांना या क्षेत्राकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने हवाई कसरती आयोजित केल्या जातात. त्यामुळे खास गणेश विसर्जनाच्या निमित्ताने फुटाळा तलावावर होणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे निमित्त साधून शेजारच्या वायुसेनानगरात यंदा हवाई कसरती आयोजित झाल्या. विंग कमांडर फली बक्षी यांच्या एयरोमॉडलिंग शो ने सुरुवात झाली.
विंग कमांडर बक्षी रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून छोट्या विमानाच्या हवाई कसरती नियंत्रित करत होते. त्यांच्या या कलेला नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. त्यानंतर दोन एमआय-१७ हेलिकॉप्टरने आकाशात काही घिरट्या घालून सलामी दिली. त्यानंतर आकाशात उंच झेपावलेल्या एमआय-१७ हेलिकॉप्टरमधून काही सैनिकांनी दोराच्या जमिनीवर उतरण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. प्रत्यक्ष युद्धकाळात सैनिक शत्रूच्या प्रदेशात कशा पद्धतीने प्रवेश करतात, याचा प्रत्यय या प्रात्यक्षिकातून देण्यात आला. त्यानंतर पाच हजार फूट उंचावर असलेल्या वायुसेनेच्या अॅव्हरो विमानातून पॅराशूटधारी सैनिकांच्या आकाशगंगा पथकाने उड्या घेतल्या. पॅराशूटच्या साह्याने या सैनिकांनी जमिनीवर विशिष्ट ठिकाणावरच अचूक लँडिंग करून आपल्या कौशल्याचा परिचय सगळ्यांना दिला.

आकाशगंगा पथकात फ्लाइंग लेफ्टनंट दीप त्यागी यांच्या नेतृत्वात या कवायती सादर झाल्या. त्यानंतर स्वदेशी बनावटीच्या ध्रुव हेलिकॉप्टर्सचा समावेश असलेल्या सारंग पथकाने सुमारे दहा मिनिटे सादर केलेल्या कसरती सगळ्यांच्या हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या ठरल्या. उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांचा कडकडाट करून वायुसैनिकांचे कौतुक केले. एअर शो चा थरार संपल्यावर नागरिक जाबाज वायुसैनिकांसोबत ‘सेल्फी’ काढून आठवणी जपण्याचा प्रयत्न
करत होते.