आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजमल कसाबला फासावर लटकवणा-यानेच याकूबचाही फास आवळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला येरवडा कारागृहात फासावर लटकवणा-या पुण्याच्या पोलिस शिपायानेच गुरुवारी पहाटे मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील गुन्हेगार याकूब मेमन यालाही नागपूरच्या कारागृहात फाशी दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

पुण्याच्या येरवडा कारागृहातून २० अनुभवी कर्मचा-यांचे पथक आठवडाभरापूर्वी नागपूर कारागृहात दाखल झाले होते. त्या पथकात या शिपायाचा समावेश होता. या शिपायाचे नाव कारागृह प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव गुप्त राखले आहे. मुंबईवरील हल्ल्यातील गुन्हेगार असलेल्या कसाबला २१ नोव्हेंबर २०१२ रोजी फासावर चढविण्यात आले होते. त्यावेळी त्याला फासावर लटकविणा-या चमूचे नेतृत्व येरवडा कारागृहाचे तत्कालीन अधीक्षक योगेश देसाई यांनी केले होते. त्या देसाई यांचीही अलीकडेच नागपूर कारागृहात बदली करण्यात अाली हाेती. याकूबचे प्रकरणही त्यांनीच हाताळले. याकूबला फाशी देणा-या शिपायाने येरवडा येथील आणखी एका शिपायाला नागपूर कारागृहात प्रशिक्षणही दिले हाेते. पथकातील इतर सदस्यांना फाशीचा दोर तसेच फाशी यार्डातील चबुतरा तयार करण्याची जबाबदारी देण्यात अाल्याची माहिती अाहे.