आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर : साहित्य संमेलनासाठी चौघांचा उमेदवारी अर्ज; शोभणे, राजन खान, डॉ. सानप गुर्जर सरसावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर  - ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अजून खूप वेळ असला तरी इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच उमेदवारी जाहीर केली आहे. विदर्भातून कथा व कादंबरीकार रवींद्र शोभणे, समीक्षक डाॅ. किशोर सानप, तर पुण्यातून कथा व कादंबरीकार राजन खान व अनुवादाच्या क्षेत्रात एक मानदंड निर्माण करणारे ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांनी आगामी ९१ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. निवडणूक प्रक्रियेला आणखी चार महिने वेळ आहे. त्यामुळे वेळेपर्यंत आणखी कोणाकोणाची उमेदवारी जाहीर होते हा औत्सुक्याचा विषय आहे.  

उमेदवारी जाहीर केल्यामुळे चर्चेत राहता येते. शिवाय प्रचार आणि प्रसारासाठीही भरपूर वेळ मिळतो. कोणत्याही कारणाने वैयक्तिक भेटीगाठींद्वारे संवाद साधता येतो. एखाद्या वेळी अपरिहार्य कारणामुळे वेळेवर उमेदवारी मागे घ्यावी लागली तरी संमेलनादरम्यान नाव सतत चर्चेत राहते. त्यामुळे पुढची संमेलन निवडणूक अधिक सोपी होऊन जाते. अशा अनेक गोष्टींमुळे ही उमेदवारी जाहीर झाल्याचे बोलले जात आहे.  

पॅपिलॉन, गॉडफादर, कोमा, सेकंड लेडी इ. पुस्तकांमुळे गुर्जरांचे नाव सर्वश्रुत आहे.  गेल्या ४२  वर्षांत त्यांची ३५ पुस्तके प्रकाशित झाली. लेखनाबरोबरच त्यांचे प्रकाशन, ग्रंथालय चळवळ, वाचन संस्कृती विकासावर मार्गदर्शन चालू राहिले.
 
फेसबुकवर उमेदवारी
कथा-कादंबरीकार रवींद्र शोभणे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून उमेदवारी जाहीर केली. गेल्या दोन-तीन निवडणुकीत शोभणे यांना थांबावे लागले. महाविद्यालयीन विद्यार्थी असतानापासून ते लेखन करीत आहेत. ३५ वर्षांचा लेखनानुभव असलेले शोभणे आता थांबायला तयार नाहीत. आता फार काळ थांबण्यात अर्थ नाही, असा त्यांचा निश्चय आहे. 
बातम्या आणखी आहेत...