आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकाच्‍या तावडीतून सुटली दहावीची विद्यार्थिनी, चौथीतील मुलीनेही अशी केली सुटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट, अकोला- अल्‍पवयीन मुलीची सुरक्षा धोक्‍यात आल्‍याचे प्रकरणं वारंवार समोर येताना दिसत आहेत. अकोला जिल्‍ह्यातील ही दोन प्रकरण वाचून आपल्‍या लक्षात येईल की, अल्‍पवयीन मुलींच्‍या सुरक्षेचा प्रश्‍न किती गंभीर झाला आहे. अकोला जिल्‍ह्यातील एका प्रकरणात नराधमाने शाळकरी मुलीला घरी नेऊन तिच्‍यावर लैंगिक अत्‍याचार करण्‍याचा प्रयत्‍न केला. तर, दुस-या प्रकरणात शिकवणीसाठी आलेल्‍या मुलीवर शिक्षकाने अत्‍याचाराचा प्रयत्‍न केला. महत्‍त्‍वाची बाब म्‍हणजे या दोन्‍ही मुलींनी साहस दाखवून नराधमांकडून आपली सुखरूप सुटका करून घेतली आहे. ही आहेत दोन प्रकरणं..

प्रकरण पहिले- अकोट
शाळेतून दुपारच्या सुटीत घरी जात असलेल्या एका दहा वर्षीय चिमुकलीला घरी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या फरार असलेल्या 30 वर्षीय नराधमाला दहिहांडा पोलिसांनी 24 तासांत पकडले. अत्याचाराला विरोध करून चिमुकलीने पळ काढून परत शाळेत आल्यावर शिक्षिकांजवळ झालेला प्रकार कथन केला.
प्रकरण दुसरे- बार्शिटाकळी
शिकवणीसाठी शिक्षकाच्या घरी गेलेल्या दहाव्या वर्गातील अल्पवयीन मुलीला फूस लावून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न फसल्याने तिचा विनयभंग करणाऱ्या शहरातील नामांकित खासगी शाळेतील शिक्षकाला पोलिसांनी २७ सप्टेंबरला अटक केली.
पुढे स्‍लाइड्सव्‍दारे जाणून घ्‍या, ही दोन प्रकरणे सविस्‍तर.. कशी केली मुलींनी सुटका..
बातम्या आणखी आहेत...