आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 लाख रुपयांच्‍या कोऱ्या नोटांपासून तयार केली गणरायाची मूर्ती, डोळ्यात तेल घालून सुरक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अकोल्‍यात 11 लाख रुपयांच्या कोऱ्या करकरीत नोटा वापरून श्रीगणेशाची मूर्ती तयार करण्यात आली आहे. गणेश चतुर्थीला मनकर्णा प्लॉटमधील वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळाने पूजेच्या गणपतीची स्थापना केली आणि त्यानंतर नोटांपासून गणपती घडवायला सुरुवात केली. चार दिवसांच्या परिश्रमानंतर ही मूर्ती तयार झाली. मूर्तीची सुरक्षा मंडळाचे कार्यकर्ते पोलिस पाहत आहेत. यंदा अशी मूर्ती स्थापन करण्याचा संकल्प पूर्ण झाल्याचे समाधान असल्याचे मंडळाचे अध्यक्ष राजेश उर्फ टिल्लू टावरी, बुढन गाडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
31 वर्षांपासून बांगड्या, रुद्राक्ष, वाळू, कापूस या पासून गणेशाची मूर्ती स्थापन करण्यात येत आहे. दरम्यान, 11 लाख रुपयांच्या नोटांपासून गणेशाची मूर्ती तयार केल्याने सुरक्षा म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याचे सांगण्यात आले. पोलिस अधीक्षकांनी सुरक्षेची जबाबदारी तुमची असे सांगितले. आम्ही आव्हान स्वीकारले. आता आम्हीच मूर्तीची रक्षण करत आहोत. त्‍यासाठी सुरक्षा फळी उभारली आहे, असे सांगण्यात आले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, नोटांपासून बनवलेला बाप्‍पा..
फोटो- नीजर भांगे, अकोला
पुढे पाहा, नाशिक शहरातील सुंदर गणेशमूर्ती व देखावे..
बातम्या आणखी आहेत...