आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र: राज यांची CM सोबत फोनवर चर्चा, स्मार्ट सिटीला पाठिंबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- काही दिवसांपूर्वी स्मार्ट सिटीच्‍या धोरणाला विरोध करणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मवाळ भूमिका घेतली आहे. मनसेने स्मार्ट सिटीच्‍या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करुन हा निर्णय घेतल्‍याची माहिती आहे.
मुख्‍यमंत्री फडणवीस यांना राज ठाकरे यांनी यासंदर्भात फोन केला. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन स्मार्ट सिटीच्या प्रस्तावातील त्रुटी दूर कराव्यात अशी फडणवीस यांची विनंती राज ठाकरेंनी मान्‍य केली आहे. त्यानंतर मनसेने या प्रस्तावाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. स्‍मार्ट सिटीबाबत जाचक अटीबाबत चर्चा करून निर्णय घ्या अशी विनंती राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी टीका केली होती की, ‘स्मार्ट सिटी ही अत्यंत फसवी योजना असून हा केंद्राचा राजकीय खेळ आहे.’ ‘महापालिकेने केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न आता केंद्र सरकार करू पाहत आहे.’ असेही राज ठाकरे म्‍हणाले होते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा..,
ठाणे - कासारवडवली परिसरात एसटी महामंडळाच्या बसला आग
समीर गायकवाडविरोधात 392 पानांचे आरोपपत्र दाखल

औरंगाबाद - हत्‍येच्‍या आरोपात सहा वर्षापासून फरार असलेला आरोपी पकडला