आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोंबिवली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी अक्षयकुमार काळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ख्यातनाम समीक्षक आणि लेखक डाॅ. अक्षयकुमार काळे यांची डोंबिवली येथे फेब्रुवारीत होणाऱ्या ९० व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. मकरंद अग्निहोत्री यांनी काळे यांच्या विजयाची माहिती दिली.

डाॅ. अक्षयकुमार काळे यांना ६९२, कवी, गीतकार व लेखक प्रवीण दवणे यांना १४२ व डाॅ. मदन कुलकर्णी यांना २७ तर जयप्रकाश घुमटकर यांना फक्त ०३ मते मिळाली. एकूण मतदार १०७१ होते. त्यापैकी ९१४ मतपत्रिका प्राप्त झाल्या. अवैध मतदान ५० झाले. मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या संवर्धन व संरक्षणाचे काम यापुढे अधिक झटून करेन, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.अक्षयकुमार काळे यांनी दिली.

डाॅ. अक्षयकुमार काळे हे ठरवून निवडून आणलेले उमेदवार आहेत. त्यामुळे एका अभ्यासू माणसाला संधी मिळाली. वैयक्तिक आरोप आणि हेत्वारोप न होता खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक झाली, हा आनंद आहे, असे प्रा. मदन कुलकर्णी म्हणाले.

काळे नववे नागपूरकर अध्यक्ष : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून येणारे डाॅ. काळे नववे नागपूरकर उमेदवार आहेत. यापूर्वी ग. त्र्यं. माडखोलकर (१९४६, बेळगाव), आ. रा. देशपांडे (१९५८, मालवण), कुसुमावती देशपांडे (१९६१, ग्वाल्हेर), वि. भि. कोलते (१९६७, भोपाळ), पु. भा. भावे (१९७७, पुणे), वा. कृ. चोरघडे (१९७९, चंद्रपूर), राम शेवाळकर (१९९४, पणजी), मारूती चितमपल्ली (२००६, सोलापूर) अध्यक्ष झाले होते.


पुढील स्लाईडवर वाचा, डोंबिवलीत होणार्‍या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे नुकतेच झाले अनावरण...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...