नागपूर - मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणातील मास्टर माइंड याकूब मेमनच्या मृत्यूदंडाची तारीख जवळ आली आहे. त्या अनुषंगाने नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात याकूबच्या फाशीसाठी काल (बुधवारी) सकाळी तीन दोर आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांना बिहारच्या बक्सर जिल्ह्यातून मागितले गेले. अजमल कसाबसाठीसुद्धा बक्सर जेलमधून फास मागवण्यात आला होता. सूत्रांनी सांगितले, की ज्या ठिकाणी याकूबला फाशी दिली जाणार आहे त्याला अमरधाम म्हणतात. हे स्थळ फाशी यार्डपासून 30 फुट अंतरावर आहे.
याकूबच्या मृत्यूदंडाचा सराव सुरू; पुतळ्याला दिवसातून तिनदा फाशी
30 जुलैला याकूब मेमनला मृत्यूदंड देणार की नाही, या बाबत शंका निर्माण झाली आहे. दरम्यान, नागपूर कारागृह प्रशासनाने 30 जुलै हीच तारीख गृहित धरून रंगीत तालीम सुरू केली आहे. त्या दृष्टीने दिवसातून तीन वेळा पुतळ्याला फाशीवर लटकवले जात आहे.
डेथ वारंट आल्यानंतर जेल प्रशासनाने मृत्यूदंडाची तयारी सुरू केली आहे. पण, त्यापूर्वी काही प्रक्रिया करणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने ज्या कैद्याला फाशी दिली जाणार आहे, त्याच्या वजनापेक्षा पाच किलो अधिक वजनाचा बाळू आणि दगडाचा पुतळा तयार केला जातो. अधिका-यांच्या पुढे त्याला फासावर लटकवून जल्लाद सराव करतात. नागपूर कारागृहात हा सराव सुरू झाला आहे.
पुढच्या स्लाइडवर वाचा किती किलोचा केला पुतळा