आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदीसाठी "एल्गार', यवतमाळ जिल्ह्यात गावागावांत पेटले दारूबंदीचे आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्णी- आर्णी तालुक्यात येत असलेल्या सुकळी येथील शेकडो महिलांनी सरपंच सुभाष जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस स्टेशनवर धडक देऊन गावात पूर्णपणे दारूबंदी करण्याच्या मागणी साठी ठाणेदाराला घेरावा टाकून गाव दारूमुक्त करा अशी मागणी लावून धरण्यात आली.
गत २४ नोव्हेंबरला येथील ग्रामपंचायतमध्ये संरपच सुभाष जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली.
त्यामध्ये प्रामुख्याने गावात दारूबंद करण्यासंदर्भात ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. कारण सुकळी या गावाची लोकसंख्या सहा हजाराच्या घरात असून हातभट्टी दारू अवैध धंद्यामुळे हजारो नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहे. तसेच गावात दारूमुळे वाद विवाद होत असून शाळकरी मुलींना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने ग्रामसभेत गावात दारूबंदी करण्यासंदर्भात ग्रामपंचायतने एकमताने ठराव मंजूर केला आहे. आज सकाळी साडे अकराच्या सुमारास सुकळी येथील शाळकरी मुली महिला यांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन पोलिस स्टेशनला धडक दिली आणि ठाणेदार संजय खंदाडे यांना दारूबंद करण्याच्या मागणीसाठी घेराव घातला. या दरम्यान ठाणेदार संजय खंदाडे यांनी दबंग स्टाईलने हजर असलेल्या महिला शाळकरी मुलीना गावात एक समिती स्थापन करून अवैध हात्तभट्टी दारू गाळणाऱ्यांचे व्हिडीओ शुटींग करून घ्या,आणि पोलिसांना कळवा त्या नंतर आम्ही कारवाई करू असे सांगितले. महिलांनी ग्रामपंचायतचा सोबत आणलेला ठरावा घेता ते यवतमाळ येथील संबंधीत विभागात द्या,असे ठाणेदार संजय खंदाडे यांनी सुकळी येथील महिलांना सांगितले. यावेळी सुकळीचे संरपच सुभाष जाधव, ग्रा.पं. सदस्य मिना पासरवाड, प्रमिला बन्सोड, शिवाणी कापसे, देवकी राठोड, यशोदा चव्हाण, देविदास जाधव, सुनिता जाधव, नंदा राठोड, सबरीबाई जाधव, सुरेखा जाधव, सविता राठोड, अनिता राठोड, गेमसिंग चव्हाण, गजानन राठोड, जितेश जाधव यांच्यासह शाळेतील मुली मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

ग्रामपंचायतींचेठराव केवळ कागदोपत्री : जिल्ह्यातसध्या सर्वत्र दारूबंदी आंदोलने करण्यात येत आहे. या आंदोलनाला बळ देण्यासाठी बऱ्याच ग्रामपंचायतींनी गावात दारूबंदीचे ठरावही घेतले आहेत. मात्र असे ठराव घेऊन वर्ष उलटूनही त्या संदर्भात अद्यापपर्यंत कुठल्याही ठोस कारवाई करण्यात आल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींचे हे ठराव केवळ कागदोपत्रीच असल्याची ओरड आता दारूबंदी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे दारूबंदीसाठी गावकऱ्यांनीच एकमुखाने निर्धार करून आंदोलन करण्याची गरज आहे.

ठाणेदारांनी हवी महिलांकडून माहिती
पोलिस ठाण्यात धडक दिलेल्या महिलांचे निवेदन स्वीकारुन त्यांना कारवाई करण्याचे आश्वासन देण्याऐवजी ठाणेदारांनी यावेळी महिलांनाच अशा अवैध धंद्यांचे फोटो काढून पोलिसांना माहिती देण्याचा सल्ला दिला. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र सुरू असलेल्या दारुबंदीच्या प्रश्नासंदर्भात ठाणेदार किती गंभीर आहेत हे दिसून येत असल्याच्या प्रतिक्रीया यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिलांकडून देण्यात येत होत्या. त्यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याची दखल घेण्याची गरज आहे.

गावातील हातभट्टी दारू बंद करा
सुकळीयेथेनेहमीकरीता पोलिस पेट्रोलिंग करत नसल्याने गावात अवैध हातभट्टीवाल्यांनी डोके वर काढले आहे. दारूमुळे गावातील शांतता भंग होत असून पोलिसांनी सुकळी येथील हातभट्टी दारू अवैध धंद्दे ताबडतोब बंद करावे. सुभाष जाधव, संरपचसुकळी
बातम्या आणखी आहेत...