आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाब विचारल्याच्या रागात दारुड्या पाेलिसाचा वरिष्ठावर गोळीबार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - दारू पिऊन ड्युटी बजावणा-या पोलिस शिपायाला वरिष्ठांनी जाब विचारल्याच्या रागात त्याने पोलिस उपनिरीक्षक आणि सहकारी शिपायावर गोळीबार केला. पोलिस उपनिरीक्षकांच्या मानेला गोळी चाटून गेली असून, सहकारी शिपायाला मानेत गोळी घुसल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

आरोपी पोलिस शिपाई रायसिंग गावडे हा बुधवारच्या मध्यरात्री ड्युटीवर असताना दारू पिऊन होता. त्या वेळी उपनिरीक्षक ठाकरे हे अधिकारी होते. ठाकरे यांनी गावडे यास दारू पिऊन ड्युटी बजावण्याविषयी जाब विचारला. त्या वेळी गावडे याने बंदुकीने ठाकरे यांच्यावर गोळी चालवली. ही गोळी ठाकरे यांच्या मानेला चाटून गेली आणि सहकारी पोलिस शिपाई सुहास बटुळे यांच्या मानेला लागली. मध्यरात्री जखमी पोलिस अधिकारी आणि शिपायांना कुरखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. या ठिकाणी दोन्ही जणांवर उपचार सुरू अाहेत. आरोपी गावडे याला पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती गडचिरोली पोलिसच्या जनसंपर्क अधिकारी तेजस्विनी पाटील यांनी दिली.