आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्री गडकरींसह सर्व 10 खासदारांचे राजीनामे मागणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- विदर्भ राज्याच्या मागणीवर विदर्भवादी संघटना आक्रमक झाल्या असून ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्यापुढे निदर्शने करून त्यांच्यासह विदर्भातील सर्व दहा खासदारांचे राजीनामे मागण्याचा निर्णय सोमवारी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. 
 
ऑगस्टपासून विदर्भासाठी सुरु होणाऱ्या तीव्र आंदोलनाची घोषणा करताना कमिटीचे संयोजक माजी आमदार राम नेवले यांनी सांगितले की, विदर्भ चंडिकेची महापूजा केल्यावर सर्व आंदोलक मोठ्या संख्येने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्यावर जाऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत. विदर्भातील सर्व दहा खासदारांचे राजीनामे मागितले जाणार आहेत. विदर्भाचे राज्य द्या, अन्यथा राजीनामे द्या, अशी घोषणाच या आंदोलनात केली जाणार असल्याचे नेवले यांनी सांगितले. 
 
२८ सप्टेंबर रोजी नागपूर करारासह केळकर समितीच्या अहवालाची संपूर्ण विदर्भात जिल्हा तालुकास्तरावर होळी करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. 
 
विदर्भात मोठ्या प्रमाणावर स्वस्त विजेची निर्मिती होते. त्यामुळे विदर्भात विजेचे दर निम्मे असावे, या मागणीसाठी २५ ऑक्टोबरला चंद्रपूर येथील वीज निर्मिती केंद्रापुढे तर ३१ ऑक्टोबरला अमरावती येथील मुख्य अभियंता कार्यालयापुढे निदर्शने केली जाणार आहेत. याशिवाय नागपूर, गोंदिया, बुलडाणा, वाशीम, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात बेरोजगार, महिला आणि युवा मेळाव्यांचा कार्यक्रमही समितीने जाहीर केला. 
 
विदर्भाच्या कानाकोपऱ्यात विदर्भ राज्य आंदोलन समितीची संघटनात्मक बांधणी करण्याची मोहिमही हाती घेण्यात आली असून, जुलैपासून प्रत्येक तालुका आणि हजार लोकसंख्येच्या गावागावांमध्ये समितीचे पदाधिकारी नेमले जाणार आहेत. जुलैपासून समितीच्या जिल्हास्तरीय बैठकांचे सत्र सुरु होणार असून प्रत्येक जिल्ह्यात या बैठका घेण्यात येणार आहेत. सोमवारी पार पडलेल्या बैठकीस अॅड.मोरेश्वर टेमुर्डे, माजी आमदार अॅड. वामनराव चटप, माजी आमदार राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, नंदा पराते यांच्यासह प्रत्येक जिल्ह्यातील कोअर कमिटीतील ७० सदस्यांच्या उपस्थितीत आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर केला. 
 
अकोला, यवतमाळात विदर्भस्तरीय परिषद भरविणार 
विदर्भ राज्याच्या मागणीच्या जागृतीसाठी ऑक्टोबरला यवतमाळ तर ऑक्टोबरला अकोला येथे विदर्भ परिषद भरविली जाणार असून त्यास विदर्भातून हजारोंच्या संख्येने विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची घोषणा समितीने केली आहे. 
 
नागपुरात विधानसभा अधिवेशन बंद पाडणार 
नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा सुरु होऊ दिले जाणार नसल्याचा दावाही समितीने केला असून त्याऐवजी विदर्भाची विधानसभा भरविण्याचा निर्णयही समितीच्या कोअर कमिटीने सोमवारी घेतला. 
बातम्या आणखी आहेत...