आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All Media Personnels Inconvince Reporting Yakub Hanging

याकूब: देशभरातील माध्यमांच्या प्रतिनिधींची दमछाक ! ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी पत्रकारांची धडपड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘याकूब की फांसी का दिल्ली मे कुछ फैसला हुवा क्या...? थोड्याच वेळात याकूबच्या फाशीवर निर्णय होणार.. कारागृहात काय सुरू आहे..? आज फाशी होणार का..?’ अशा एक ना अनेक प्रश्नांचा वेध घेताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर बुधवारी रात्री नागपुरातून सतत भडिमार सुरू होता.

याकूबच्या फाशी संदर्भात वार्तांकनासाठी देशभरातून नागपुरात दाखल झालेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींची रात्रभर चांगलीच दमछाक उडाली. फाशीबाबत क्षणाक्षणाचे वृत्त जाणून घेण्यासाठी देशविदेशातील नागरिकांची उत्सुकता ताणली हाेती. त्यामुळे क्षणाक्षणाचे वार्तांकन लाइव्ह देण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनीही संपूर्ण रात्र जागून काढली. वर्धा रोडवरील कारागृहाच्या पाचशे मीटर अंतरावर सर्व प्रसारमाध्यमांना रोखण्यात आले होते, तर याकूबचा भाऊ सुलेमान आणि उस्मान हे एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. सुलेमान आणि उस्मान हॉटेलमधून निघतानाचे क्षण टिपायचे की कारागृहासमोरील घडामोडी दाखवायच्या, अशा द्विधा मन:स्थितीत इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांची चांगलीच तारांबळ उडाली. कारागृहात नेमके काय सुरू आहे याची माहिती मिळवताना प्रसारमाध्यमे सतत व्यग्र होते. एकीकडे कारागृहात फाशीची प्रक्रिया सुरू झाली होती, तर दुसरीकडे राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यांतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येणे बाकी होते. त्यामुळे दिल्लीतील ही बातमी व नागपुरातील घडामाेडी सर्वप्रथम अापल्याच वृत्तवाहिनीवर देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमध्ये कमालीची स्पर्धा दिसून अाली.

ओबी व्हॅन उभ्या करण्यात अडचणी
इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या थेट प्रक्षेपणाकरिता नागपुरात दाखल झालेल्या विविध वृत्तवाहिन्यांच्या ओबी व्हॅन कारागृह परिसरात उभ्या करतानाही माध्यमांना अडचणींचा सामना करावा लागला. ओबी व्हॅन उभी केली, त्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्थेच्या कारणांवरून माध्यमांना पोलिस यंत्रणेच्या मनाई आदेशाचा सतत सामना करावा लागला. नागपुरातील अजनी चौकात या व्हॅन उभ्या केल्या असता कायद्याचा बडगा दाखवत पोलिसांनी व्हॅन काढण्यास सांगितले, त्यामुळे माध्यम प्रतिनिधींची चांगलीच धावाधाव झाली.

पुढे वाचा... संचार बंदीसदृश स्थिती