आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Allocation Decisions Of 1 Thousand Water Vessel For Birds

एक हजार जलपात्र वाटपाचा निर्णय, पक्ष्यांची तहान भागवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सध्या प्रचंड ऊन आहे. या उन्हामुळे जिवाची लाहीलाही होते, उन्हाचा तडाखा पक्ष्यांनाही बसतो. अनेकदा तर पाणी मिळाल्यामुळे पक्षी मृत होतात. अशाच पक्ष्यांना ठिकठिकाणी पिण्यासाठी पाणी मिळावे, हा उद्देश समोर ठेवून शहरातील काही युवकांनी मातीचे जलपात्र खरेदी केले. ते केवळ स्वत:च्या घरी किंवा परिसरात ठेवता ज्यांनी कोणी त्यांना जलपात्र मागितले, त्या व्यक्तींना जलपात्र घरपोच ते पोहचवून देतात. विशेष म्हणजे हे सर्व कार्य हे युवक विनामूल्य करतात. या उपक्रमातून पक्ष्यांची तहान भागवण्याचा त्यांचा सकारात्मक प्रयत्न आहे.
अमरावती शहराचा विचार केला असता सध्या सरासरी ४४.५ अंश किंवा त्यापेक्षा अधिक तापमान आहे. या तापमानामुळे दुपारी रस्ते निर्मनुष्य होतात. अशा उन्हात पाणी जर प्यायला नाही मिळाले तर काय अवस्था होते, याचा अंदाज येतो. माणसांसाठी अनेक ठिकाणी पाणपोई लागलेल्या असतात, ते कुठेही पाणी पिऊन आपली तहान भागवू शकतात. मात्र, पक्ष्यांना ही सुविधा नाही. त्यामुळेच शहरातील नीलेश कंचनपुरे, गुणवंत पाटील, शेखर पाटील, कुवरचंद श्रीराव, अभिजित दानी अन्य काही युवकांनी पक्ष्यांना उन्हाळ्यात पाणी उपलब्ध व्हावे म्हणून मातीचे जलपात्र वाटपाचा उपक्रम तीन वर्षांपासून सुरू केला. पहिल्या वर्षी या युवकांनी ५०, दुसऱ्या वर्षी १०० जलपात्र वाटले. मात्र, हे अपुरे आहे. त्यामुळे त्यांनी यंदा एक हजार मातीचे जलपात्र वाटपाचा निर्णय घेतला. यासाठी आर्थिक मदत यशवंत मानव विकास प्रशिक्षण संस्थेचे उज्ज्वल थोरात यांनी केली आहे. मध्य प्रदेशातून तयार करून बोलावलेले मातीचे १००० जलपात्र नीलेश कंचनपुरे त्यांचे सहकारी मागील काही दिवसांपासून शहरात वाटत आहेत. ज्या व्यक्तींनी त्यांना जलपात्र मागितले, त्यांना ही मंडळी घरपोच नेऊन देतात. मातीचे असलेले हे जलपात्र योग्य पद्धतीने अडकवता यावेत म्हणून त्याला दोरी बांधून देतात. या जलपात्राचे वाटप युवकांनी सुरू केले आहे.

पक्ष्यांना सर्वत्र पाणी मिळावे
नागरिकांना पाण्याचे पात्र देताना नीलेश कंचनपुरे.
^पक्ष्यांची संख्याकमी होत आहे. उन्हाच्या तडाख्यात जर पक्ष्यांना पाणी नाही मिळाले, तर पक्ष्यांचे प्राण जाऊ शकतात. म्हणून आम्ही मातीचे १००० जलपात्र वाटण्याचा निर्णय घेतला. संपर्क केल्यास जलपात्र घरपोच पोहोचवतो. आतापर्यंत ७०० जलपात्र वाटले असून, ३०० जलपात्र नागरिकांना देणार आहे. पक्ष्यांना पाणी मिळावे, हाच प्रयत्न आहे. नीलेश कंचनपुरे, वन्यजीव पक्षीप्रेमी.