आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडनेरात चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडनेरा- चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना बडनेरात उघड झाली. राेशन राजेश पवार याने मद्यधुंद अवस्थेत चार वर्षीय चिमुकलीला केक देण्याचे आमिष दाखवित अत्याचार केल्या. दरम्यान चिमुकलीचा रडण्याचा आवाज येत असल्याने शेजाऱ्यांनी घरात शिरून पाहिले असताना आरोपीचे हे कृत्य निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोध मोहीम राबवित रोशन राजेश पवार (वय २०) याला ताब्यात घेतले.
 
 पीडीतेच्या आई-वडिलांचा तक्रारीवरुन पोलिसांनी भादंविच्या ३७६, ३७७, ३४२, ५०६ कलमांसह बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याअंतर्गत ४,८,१०, १२ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे बडनेरा शहरामध्ये खळबळ उडाली असून मुलींच्या सुरक्षितेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...