आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कृउबासचे अतिक्रमण हटवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - कृषीउत्पन्न बाजार समितीसह वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण हटविण्यात आले. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत तीन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. स्थानिक मालवीय चाैक येथून कारवाईस सुरूवात करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समिती समोरच्या मुख्य रस्त्यावरील हातगाड्या हटविण्यात आल्या. कारवाई सुरू केल्यानंतर अनेक हॉकर्सनी हातगाड्या घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीत धाव घेतली. मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी देखील हॉकर्संना बाहेर काढले. त्यानंतर त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर चित्रा चौक, नगर वाचनालय, श्याम चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, गांधी चौक, इर्वीन चौक, पंचवटी चौक, गाडगेनगर, शेगाव नाका, कठोरा नाका चौकातील हातगाडी, फ्रुट विक्रेते, नास्ता विक्रेत्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. ही कारवाई अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश कुत्तरमारे, निरीक्षक प्रवीण इंगोले, उमेश सवाई, पोलिस उपनिरीक्षक विजय चव्हाण, भारत बघेल, अमोल पान्हेकर, किशोर कनोजे, सतिश खंडारे, संजय कोल्हे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...