आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amaravati Ngo Take Initiative For Needy Person News In Divya Marathi

गरजूंसाठी गोळा केली हजार किलो रद्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अमरावती येथील २२ वर्षांची कोमल कुंभलकर ही वयाच्या १२ व्या वर्षापासून ब्लड कॅन्सरसोबत हसत-हसत लढा देत आहे. खरं तर कोमलच्या उपचारासाठी मुख्यमंत्री, पंतप्रधान निधीमधून अन्य संस्थांकडून मदत मिळण्याची बरीच शक्यता आहे. पण, हा केवळ आर्थिक मदतीचा प्रश्न नसून कोमलची तिच्यासारख्या अनेकांची लढाई लाखो लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने प्रयास सेवांकुर या सेवाभावी संस्थेने प्रेरणा घेऊन एक स्तुत्य उपक्रम राबवला.
समाजातील परोपकाराविषयीची संवेदनेला बळ मिळेल तथा तरुणाईची ताकद विधायक उपक्रमांकडे वळावी, या अनुषंगाने प्रयास सेवांकुरचे डॉ. अविनाश सावजी यांनी व्हॅलेंटाइन हा दिवस मानव प्रेम दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या अभिनव उपक्रमातून शहरातील नागरिकांकडून रद्दी गोळा करून त्यामधून जमा होणारी रक्कम ही गरजू दुर्धर आजाराशी लढा देणाऱ्या रुग्णांसाठी उपयोगात यावी, यासाठी सेवांकुर केअरिंग फंड सुरू केले आहे. या फंडमध्ये जमा होणारा निधी हा कोमल तिच्यासारख्या गंभीर दुर्धर आजाराशी झुंज देणाऱ्या हीरोंसाठी वापरण्यात येणार आहे. व्हॅलेंटाइन डेपासून संपूर्ण शहरात हा उपक्रम राबवण्यात आला. या उद्देशाने शहरातील नागरिकांकडून रद्दी गोळा करण्यात आली. गोळा झालेल्या या रद्दीच्या रकमेतून हा निधी अशा गरजूंच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे. अमरावती शहरातील ३१ चौकांत ही रद्दी संकलित करण्यासाठी प्रयासचे स्वयंसेवक तैनात होते. या अभियानाद्वारे शहरातून तब्बल हजार किलो रद्दी गोळा करण्यात आली.
५० वर तरुणाईने केला उपवास
दुर्धरआजाराशी हसत-हसत लढा देणाऱ्या कोमलसारख्या इतर गरजूंसाठी प्रयास सेवांकुरच्या ५० वर स्वयंसेवकांनी एक दिवसाचा उपवास ठेवला होता. अशांना मोरल सपोर्ट देण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तरुणाईने हा उपवास ठेवला होता. व्हॅलेंटाइन डेला तरुणाईने हा उपवास ठेवून एक वेगळे गिफ्ट कोमलला इतर झुंज देणाऱ्या रुग्णांना दिले.