आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आश्रमशाळेच्या स्वयंपाक्यानेच केला प्रथमेशच्या हत्येचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - धामणगावरेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथील श्री संत शंकर महाराज विद्यामंदिरात पाचव्या वर्गात शिकणारा येथीलच वसतिगृहात राहणाऱ्या प्रथमेश सूर्यभानजी सगणे (रा. अमरावती) या ११ वर्षीय चिमुकल्याच्या गळ्यावर ब्लेडने वार करण्यात आले होते. त्याच्या हत्येचा प्रयत्न आश्रमशाळेतच कंत्राटी पध्दतीने कामावर असलेल्या दोघांसह अन्य एकाने केला. नरबळीतून प्रथमेशच्या हत्येचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी रविवारी (दि. १४) रात्री दोघांना अटक केली आहे तर एकाला ताब्यात घेतले आहे.

सुरेंद्र रमेशराव मराठे (३०, रा. पिंपळखुटा, ता. आर्वी, जि. वर्धा) आणि नीलेश जानरावजी उके (२२, रा. पिंपळखुटा, ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती) या दोघांना पोलिसांनी अटक केली असून यांच्याच एका १७ वर्षीय सहकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. सुरेंद्र मराठे हा मागील काही महिन्यांपासून श्री संत शंकर महाराज वसतिगृहात कंत्राटी पध्दतीने स्वयंपाकी म्हणून काम करत आहे. त्याने ते वर्षांपूर्वी काली विद्या संदर्भात एक पुस्तक वाचले, तसेच त्याचवेळी अन्य एका व्यक्तीने त्याला काली विद्या प्राप्त करण्यासाठी एखाद्या निष्पाप मुलाचे रक्त अंगाला लाव, त्याचा बळी घे, असे सांगितले होते. त्यामुळे सुरेन्द्रच्या डोक्यात तेच भिनले होते. घटनेच्या दिवशी म्हणजेच ऑगस्ट २०१६ ला सकाळी प्रथमेश त्याच्या काही मित्रांसमवेत वसतीगृहाच्या खाली उभा होता. त्यावेळी सुरेंद्र, नीलेश त्यांचा एक मित्र या तिघांनी प्रथमेशला पाहीले. सुरेन्द्रने प्रथमेशला चाॅकलेट दिले, खालून मोबाईलला रेंज मिळत नसल्यामुळे आपण वर जाऊन बोलू असे सांगितले आणि त्याला घेऊन वसतिगृहाच्या तिसऱ्या माळ्यावर गेला. त्याचठिकाणी दोघांनी प्रथमेशचे हातपाय पकडले आणि सुरेन्द्रने खिशातील ब्लेड काढून त्याच्या गळ्यावर तीन वार केले. त्यानंतर नीलेश सुरेन्द्रने त्याला तिसऱ्या माळ्यावरून पहिल्या माळ्यावर आणून टाकले आणि पळ काढला. या जीवघेण्या वारानंतरही प्रथमेश उठला कसाबसा खाली उतरला आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या प्रकरणाचा तपास मंगरुळ दस्तगीर पोलिसांकडून सुरू होता. दरम्यान, चांदूर रेल्वेचे एसटीपी श्रीनिवास घाडगे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय नागेश चतरकर, मुलचंद भांबुरकर, अरुण मेटे, सचिन मिश्रा, शकिल चव्हाण, लोहकरे, दिलीप राऊत तसेच मंगरुळचे ठाणेदार शेळके यांच्या पथकाने केली आहे.

जीवे मारण्याची दोघांना दिली धमकी
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुरेंद्र असून त्याने या कामासाठी नीलेश अन्य एकाला सोबत घेतले, त्यांनी सुरुवातीला सुरेन्द्रला नकार दिला. त्यावेळी या दोघांनाही सुरेन्द्रने जीवाने मारून टाकणार, अशी धमकी दिली. त्यामुळे त्यांनी मदत केली,असे पोलिसांनी सांगितले.

नरबळीसाठी केला हत्येचा प्रयत्न
^याप्रकरणीतिघांना ताब्यात घेतले असून दोघांना अटक केली आहे. नरबळीसाठी प्रथमेशला लक्ष्य करून त्याच्या गळ्यावर वार केले आहेत. मारेकऱ्यांविरुध्द प्राणघातक हल्ला, अंधश्रध्दा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हे दाखल केले. श्रीनिवासघाडगे, एसडीपीओ, चांदूर रेल्वे.
बातम्या आणखी आहेत...