आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amaravati Tahasil Office Now Online News In Divya Marathi

एका क्लिकवर मिळेल नागरिकांना माहिती, संकेतस्थळावर करता येणार आॅनलाइन अर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- नागरिक महसूल प्रशासनातील महत्त्वपूर्ण दुवा असलेल्या अमरावतीच्या तहसील कार्यालयावर लवकरच इंटरनेटवर झळकणार आहे. तहसील कार्यालयाचे स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. आगामी काही दिवसांमध्ये अमरावती तहसील कार्यालयाची माहिती नागरिकांसाठी इंटरनेटवर उपलब्ध होणार आहे.

महसूल प्रशासनाने यामध्ये गतिमानता आणण्याचे कार्य मागील काही वर्षांमध्ये केले आहे. ई-गव्हर्नन्स प्रणाली आरंभ करत विविध प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधीदेखील कमी करण्यात आला. शिवाय आधुनिकतेकडे पाऊल टाकत अमरावती तहसील कार्यालयाचे स्वतंत्र संकेतस्थळदेखील निर्माण केले जात आहे. स्वतंत्र संकेतस्थळ असलेले अमरावती तहसील कार्यालय हे विदर्भातील पहिले कार्यालयदेखील ठरणार आहे. महसूल प्रशासनातील तहसील कार्यालय नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचत असल्याने या कार्यालयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवाय शैक्षणिक ते अन्य शासकीय कामकाजाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्रदेखील तहसील कार्यालयामार्फत दिल्या जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून शेतकरी ते नागरिक सर्वांचा तहसील कार्यालयाशी संबंध येतो. तहसील कार्यालयाकडून कोणती कामे केली जातात, नागरिकांना येथून कोणती प्रमाणपत्रे मिळतील याची माहिती उपलब्ध केली जाणार आहे. कार्यालयातील अधिकारी, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी तलाठी आदी माहिती दिली जाणार आहे. तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, पुरवठा, निवडणूक, रोजगार हमी योजना आदी विविध विभागाकडून कोणती कामे केली जातात, प्रमाणपत्रे आदी माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. विविध अर्जांबाबत संकेतस्थळावर लिंक दिली जाणार असून, त्याद्वारे नागरिकांना ऑनलाइन अर्जदेखील करता येईल. तहसील कार्यालयातून विविध शैक्षणिक प्रमाणपत्र तत्काळ मिळत नसल्याची अनेकांची तक्रार राहायची. जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ आहे, मात्र तहसील क्षेत्राविषयी माहिती असणारे स्वतंत्र संकेतस्थळ यापूर्वी निर्माण झाले नाही. शासनाच्या योजना अधिक जलद गतीने नागरिकांना मिळाव्यात म्हणून तहसीलदार सुरेश बगळे यांनी हा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण करण्याच्या दृष्टीने मागील अनेक दिवसांपासून दस्तऐवजांचे संगणकीकरण करण्याचे कार्य केल्या जात आहे. अमरावती तालुक्यात येणाऱ्या गावातील सांझे, मौजे आदी माहितीदेखील आधुनिक स्वरूपात संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

ऑनलाइन सुविधा मिळेल
^तहसीलकार्यालयाचेस्वतंत्र संकेतस्थळ निर्माण करण्याची तयारी सुरू आहे. आगामी काही दिवसांमध्ये ही सेवा सुरू केली जाईल. तहसीलची माहिती, कार्यप्रणालीबाबत नागरिकांना माहिती िमळेल . ऑनलाइन अर्जांबाबतदेखील लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे.
- सुरेश बगळे, तहसीलदार, अमरावती.