आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर वाहतूक विभागातील कर्मचारी 'रेड सिग्नल'वर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी बाह्य सुधारणांसोबतच वाहतूक विभागातील अंतर्गत सुधारणांवर पोलिस आयुक्तांनी लक्ष केंद्रित केले आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यास अपयशी ठरलेले वर्षानुवर्ष वाहतूक शाखेत चिटकून असलेले कर्मचारी सध्या आयुक्तांच्या 'रेड सिग्नल'वर आले आहेत.

शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये अामूलाग्र बदल सुधारणा घडवून आणण्यासाठी सक्षम कर्मचाऱ्यांची यादी तयार केली आहे. या पार्श्वभूमीवर वारंवार वाहतूक शाखेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादीही आयुक्तांनी मागवली आहे. अंतर्गत सुधारणेचा एक भाग म्हणून वाहतूक पोलिसांजवळचे चालान बुकही काढून घेण्याची शक्यता पडताळून पाहिली जात असून, पोलिस उर्वरितपान.

तातडीने मागितली यादी
^शहरातीलवाहतुकीलाकायमस्वरूपी शिस्त लागावी, हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच वाहतूक कर्मचाऱ्यांच्या कामातही काही चांगले बदल करण्यात येणार आहे. अशा वेळी प्रत्येक कर्मचाऱ्याचे शारीरिक फिटनेस लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच वाहतूक शाखेतील ४५ वर्षांवरील, दुसऱ्यांदा वाहतूक शाखेत पोलिस ठाणे केलेल्या कर्मचाऱ्यांची यादी मागितली आहे. ती यादी आमच्याकडे आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येतील.
- नितीन पवार, पोलिसउपायुक्त (वाहतूक)

रेल्वे पार्किंगची केली पाहणी
अमरावतीच्यामॉडेल रेल्वे स्टेशनवर सकाळी वाजता तसेच सायंकाळी ते दरम्यान वाहनांची प्रचंड गर्दी राहते. त्यामुळे या ठिकाणी अस्ताव्यस्त वाहतूक होते. दरम्यान बुधवारी पोलिस उपायुक्त नितीन पवार, वाहतूक शाखेचे प्रभारी एसीपी पोलिस निरीक्षक बळीराम डाखोरे, पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम, नीलिमा आरज यांच्यासह रेल्वेचे अधिकारी, आरपीएफ जीआरपीचे पोलिस यांनी रेल्वेस्थानकावरील वाहतुकीचा आढावा घेतला तसेच बडनेरा रेल्वे स्टेशनवरसुद्धा रेल्वेचे मोठे जाळे आहे.