आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनेक दिग्गज होणार निर्वासित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही स्वायत्त संस्थांच्या आरक्षणाची सोडत बुधवारी (दि. ५) जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर करण्यात आली . या नवीन आरक्षणामुळे अनेक मातब्बर नेत्यांचे 'राज'कारण संपुष्टात येणार आहे. संपुष्टात आलेले आपले राजकीय वर्चस्व कायम राखण्यासाठी त्यांना नवीन मतदार संघांचा शोध घ्यावा लागणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. दरम्यान, बुधवारी जिल्ह्यातील सर्व ५९ जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. यात अनुसूचित जातीसाठी ११, अनुसूचित जमातीसाठी १२, इतर मागासवर्गीयांसाठी १६ तर खुल्या गटासाठी २० जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
जिल्ह्याचे मुख्य निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी िकरण गित्ते, िनवडणूक अधिकारी रामदास सिद्धभट्टी यांच्यासह जिल्हा परिषद सदस्यांच्या उपस्थितीत बचत भवनात शालेय विद्यार्थिनीच्या हाताने जिल्हा परिषदेच्या ५९ जागांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. प्रभागरचनेच्या दुसऱ्या टप्प्याची ही आरक्षण सोडत असून ती चक्रानुक्रे काढण्यात आली. याआधी २०१२ च्या जि.प.निवडणुका २००१ नुसार झाल्या होत्या. पंचायत समितीसाठी िनवडणूक आयोगाने २०११ च्या जनगणनेच्या आधारे िनवडणुकीचे आरक्षण घोषित केले आहे. नांदगांव खंडेश्वर येथे अनुसूचित जमातीची लोकसंख्या हजार ९२३, अनुसूचित जातीची २९ हजार ९३ अशा एकूण लक्ष १६ हजार २३८ लोकसंख्येच्या आधारे आरक्षणाची कक्षा ठरविण्यात आली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, स्त्रीयांसाठी ५० टक्के आरक्षण सर्वसाधारण गटांना ध्यानात घेत करण्यात आलेली सोडत शांततेत पार पडली आहे. दरम्यान आरक्षणावर आक्षेप नोंदवू इच्छिणाऱ्या नागरिकांना १० ते २० आॅक्टोबर या कालावधीत आक्षेप नोंदविता येणार आहे. १७ ते २० आॅक्टोबरपर्यंत या प्रकरणी सुनावणी होऊन त्यानंतर प्रभागरचना केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी आरक्षण सोडतीनंतर िदली.
आरक्षण सोडतीमुळे अनेक िदग्गजांचे मनसुबे उधळले गेले आहेत. कुठे समाधान तर कुठे नापसंतीचे वातावरण आहे. या आरक्षणाद्वारे जिल्ह्यातील राजकीय चित्र पालटण्याची शक्यता िनर्माण झाली आहे. या िनवडणुकीत जिल्ह्यातील १८ लक्ष १३ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या १८ टक्के अर्थात लक्ष ४० हजार ५३४ असून अनु. जमातीच्या मतदारांची संख्या २० टक्के म्हणजे लक्ष ७३ हजार ८९० आहे. उर्वरित मतदार हे खुल्या गटातील आहेत.
बातम्या आणखी आहेत...