आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात अल्पवयीन बिहारी मुलांचा मजुरीसाठी वापर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- परराज्यातूनमजुरीसाठी शहरात आलेल्या जवळपास सात ते आठ बिहारी मजुरांमध्ये एक अल्पवयीन मुलगा गुरुवारी (दि.१५) आढळून आला.या मुलाची पोलिसांनी चौकशी करून त्याला बालसुधारगृहात पाठवले. काही पैशांसाठी माझ्या पालकानेच मला विकल्याची खळबळजनक माहिती एका अल्पवयीन मुलाने दिली आहे. दरम्यान, सिटी कोतवाली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, अल्पवयीन मुलांना बळजबरीने मजुरीसाठी शहरात आणणारी एखादी टोळी सक्रिय आहे काय? याचा पोलिस शोध घेत आहे.

एका फिर्यादीच्या तक्रारीवरुन, मजुरीसाठी अल्पवयीन बिहारी मुले शहरात वास्तव्यास असल्याची माहिती तक्रारकर्त्याने पोलिसांना दिली होती. दरम्यान,शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये हे सर्वच मुले राहत असल्याचे पोलिसांना कळाले. मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्या खासगी हॉटेलवर धाड टाकून त्या अल्पवयीन मुलांची कसून चौकशी केली. दरम्यान चौकशीला आल्यानंतर एक अल्पवयीन इतर १८ ते २५ वयोगटातील मुले असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे हे सर्वच मुले बिहारमधूनकामासाठी शहरात आल्याचे चौकशीत पुढे आले. दरम्यान, पोलिसांनी अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन बाल सुधारगृहात पाठवले. या मुलाच्या आई-वडिलांना माहिती देऊन पुढील तपास करण्यात येईल, असे सुत्रांकडून सांगण्यात आले.

पालकांनासांगताच आले शहरात : मजूरीसाठीआलेले हे युवक पालकांना सांगताच शहरात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामधील काही मुलांना आपल्या पालकांनी विकल्याचेही धक्कादायक माहिती आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन या मुलांपैकी एक अल्पवयीन असून इतर १८ ते २५ वयोगटात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुलांना आणणारी व्यक्ती राहते भुसावळ शहरात
ज्यानेमुलांना शहरात राेजगार देण्यासाठी आणले आहे, ती व्यक्ती भुसावळ येथे राहते. माहिती मिळाल्यानंतर सदर प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. काही धागेदोरे मिळविण्यासाठी पोलिसांचा तपास सुरु आहे. दिलीपपाटील, ठाणेदार, सिटी कोतवाली.