आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णवाहिकेला ट्रकची धडक; चाैघांचा मृत्यू; नागपूरजवळ भीषण अपघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- अपघातातील जखमींना अकोला जिल्ह्यातून नागपुरात उपचारासाठी अाणणाऱ्या रुग्णवाहिकेलाच विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात रुग्णवाहिकेतील चौघे जण मृत्यूमुखी पडले तर पाच जण गंभीर जखमी झालेत.  सोमवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. दाट धुक्यामुळे ट्रकचालकाला अंदाज आला नसावा आणि अपघात झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.


अकोला जिल्ह्यातील आगर येथील आकाश रामेश्वर भालेराव (वय १२) आणि लक्ष्मी किसना बावने (वय ३५) या दोघांचा गावी अपघात झाला हाेता. त्यात हे दाेघे जखमी झाले हाेते. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तातडीने नागपूरला हलविणे अावश्यक हाेते. त्यानुसार भालेराव व बावने कुटुंबीय या दोघांना घेऊन रुग्णवाहिकेने नागपूरच्या दिशेने निघाले. मात्र पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास त्यांच्या रुग्णवाहिकेला समोरून अालेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की त्यात रुग्णवाहिकेचा अक्षरश: चेंदामेंदा होऊन त्यातील चौघे जण ठार झाले तर पाच जण जखमी झाले. आकाश रामेश्वर भालेराव (वय १२) याच्यासह त्याची आई विमल रामेश्वर भालेराव (वय ३०) श्रीराम महादेव धारपवार (वय ४०,  तिन्ही रा. आगर) तसेच प्रमोद दिगंबर बंड (वय ३४ रा. लाड उमरी, अकोला) अशी मृतांची नावे अाहेत. तर लक्ष्मी किसना बावने (वय ३५), ईश्वर मोहन मुद‌्गल (वय २४), किसना अंबादास बावने (वय ४५), अंबादास राजाराम बावने, रामेश्वर जानराव भालेराव (वय ३४) हे जखमी झाले. त्यांच्यावर  नागपूरमधील मेयो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. वाडी पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...