आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अम्माच्या निधनाने गडकरींच्या मुलीचे रिसेप्शन होणार साधेपणाने, गोड पदार्थ वगळले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- केंद्रीय रस्ते विकास व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची कन्या केतकी आणि सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कासखेडीकर यांचे सुपुत्र आदित्य यांचे लग्न रविवारी मोठ्या धुमधडाक्यात पार पडले. त्याचे रिसेप्शन आज (मंगळवार) नागपुरात होणार आहे. पण तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे रिसेप्शनचा कार्यक्रम साध्या पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे.
नागपुरमधील एम्प्रेस सभागृहात केतकी आणि आदित्य यांचे लग्न मोठ्या दिमाखात पार पडले होते. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, प्रकाश जावडेकर, मनेका गांधी, श्रीलंकेचे अर्थमंत्री रवी करुणानायके, योगगुरू रामदेवबाबा यांच्यासग राजकीय, सामाजिक, व्यावसायीक आदी क्षेत्रातील मान्यवर या लग्नाला प्रामुख्याने उपस्थित होते. आदित्य फेसबुकमध्ये अधिकारीपदावर कार्यरत आहे.
आज नागपुरमध्येच याचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याची जोरदार तयारी करण्यात आली होती. लग्नाप्रमाणेच रिसेप्शन भव्यदिव्य होणार होते. पण जयललिता यांच्या मृत्यूमुळे हा सोहळा साध्यापणाने साजरा करण्यावर गडकरी कुटुंबीयांनी भर दिला आहे. त्यामुळे फुलांच्या सजावटीतही मोठी कपात करण्यात आली आहे. जेवणातून गोड पदार्थ वगळण्यात आले आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, असे दिमाखात झाले होते केतकी आणि आदित्य यांचे लग्न....
बातम्या आणखी आहेत...