आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच दिवसांत 6 ग्राहकांचे खात्यातून उडवले 6 लाख 64 हजार रुपये; OTP न मागताच काढतात रक्कम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - घरी ठेवलेल्या रकमेची चोरी होण्याची भीती असल्याने कुणीही घरात जास्त रक्कम ठेवत नाही. त्यामुळे पै पै जमा केलेली रक्कम सुरक्षित रहावी म्हणून प्रत्येकासाठीच रक्कम ठेवण्यासाठी सुरक्षित ठिकाण बँक राहते. मात्र मागील तीन ते चार महिन्यांपासून बँक खात्यातील रक्कम कोणताही ओटीपी न देता किंवा फोनवर माहिती न देताच परस्पर एटीएमद्वारे लंपास केली जात आहे.
 
मागील पाच दिवसांत शहरातील सहा ग्राहकांचे तब्बल 6 लाख ६४ हजार रुपये अशाच पद्धतीने उडवण्यात आले. विशेष म्हणजे हे सहाही ग्राहक ‘एसबीआय’चे आहेत. या प्रकारांमुळे आता बँकेतही रक्कम सुरक्षित नाही, बँकेने आमचा विश्वासघात केल्याची प्रतिक्रिया फसवणूक झालेल्या एका संतप्त ग्राहकाने व्यक्त केली. 
 
रक्कम सुरक्षित रहावी, यासाठी सर्वसामान्य व्यक्ती बँकेत रक्कम ठेवतात. मात्र मागील दोन ते तीन वर्षांपासून अनोळखी क्रमांकावरून अनेक ग्राहकांना फोन येतो. आम्ही बँकेतून बोलत असून तुमच्या कार्डविषयी माहिती द्या, अशी बतावणी करून बँक ग्राहकांची ऑनलाइन लूट करण्यात येत आहे. ही लूट अद्यापही थांबलेली नाही. अशा ठकबाजांचा सायबर पोलिस यंत्रणा मागील तीन वर्षांपासून ‘बंदोबस्त’ करू शकले नाही. बँकेने सुद्धा त्यावर काही उपाययोजना केल्या नाहीत. त्यासंदर्भात ग्राहकांमध्ये आता काही प्रमाणात जागृती झाली. मात्र अजूनही ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. 
 
दरम्यान, मागील तीन ते चार महिन्यांपासून ऑनलाइन रक्कम उडवणारे चोरटे आणखी ‘हायटेक’ झाले. आता ग्राहकांना फोन येत नाही, खात्याची माहिती घेत नाही, कोणत्याही प्रकारचा ‘ओटीपी’ मागितला जात नाही. तरीही बँक खात्यात असलेली लाखो रुपयांची रक्कम चुटकीसरशी उडवली जात आहे. ग्राहकाला थेट खात्यातून रक्कम कमी झाल्याचा मेसेज मोबाइलवर आल्यानंतरच आपली रक्कम गायब झाल्याचे समजते. शहरातील गाडगेनगर ठाण्यांतर्गतच्या जयवंत इंदूरकर (३२, रा. महेंद्र कॉलनी) यांच्या खात्यातून परस्पर लाख ६० हजार रुपये उडवलेत. त्यानंतर सरस्वती नगरमधील संतोष किरनाके यांचे ६४५०० हजार रुपये आणि अन्य एका महिलेचे लाख २० हजार रुपये उडवले आहेत. या तिन्ही घटना १२ ते १३ ऑक्टोबरदरम्यान घडल्या. या तिन्ही व्यक्तींचे बँक खाते राठी नगरमधील एसबीआयमध्ये आहेत. या तिघांनीही गाडगेनगर ठाण्यात तक्रार दिली. तसेच बडनेरा येथील अरुण बेलखेडे यांच्याही बडनेराच्या एसबीआय खात्यातून अशाच प्रकारे लाख ६० हजार रुपये १३ ते १४ ऑक्टोबरला उडवले आहेत. 

बडनेरा येथीलच रहिवासी विनोद माणिकराव करंडे (रा. बारीपुरा, बडनेरा) यांचे चांदूर रेल्वे एसबीआयमध्ये खाते आहे. त्यांच्या खात्यातून याच पद्धतीने परस्पर १५ ते १६ ऑक्टोबरदरम्यान गुडगाव येथून लाख रुपये काढण्यात आले. त्यांनी चांदूर रेल्वे ठाण्यात तक्रार दिली. तसेच शहरातील रहिवासी मोर्शीला नोकरी करणारे शेख हनिस अब्दुल हमीद (५०) यांचे मोर्शीच्या एसबीआय बँकेत खाते आहे. त्यांच्या खात्यातूनही १६ ते १७ ऑक्टोबरदरम्यान राजस्थानमधील एका एटीएमवरून ६० हजार रुपये काढण्यात आले. या सहाही घटना मागील पाच दिवसांत घडल्या आहेत. या सहा जणांचे लाख ६४ हजार ५०० रुपये उडवण्यात आले.
 
बँकअधिकाऱ्यांसोबत चर्चा केली : बडनेरा,गाडगेनगर ठाण्यात परस्पर रक्कम काढल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. त्यामुळे एसबीआय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ज्या ज्या ठिकाणांच्या एटीएमवरून रक्कम काढली, त्या ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज आम्ही बँकेला मागितल्याचे सायबर सेलचे पीएसआय कान्होपात्रा बन्सा यांनी सांगितले. 
 
गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील सरस्वती नगरमध्ये राहणारे संतोष किरनाके हे दररोज पहाटे पासून घरोघरी जाऊन पेपर वाटतात. तसेच दुपारच्या वेळी घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचवतात. अशा पद्धतीने ते दिवसाकाठी २०० ते ३०० रुपये कमवतात. दरम्यान, दुचाकी खरेदीसाठी त्यांनी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. दिवाळीच्या दिवशी ते दुचाकी खरेदी करणार होते. त्यांनी सर्व रक्कम राठी नगरमधील एसबीआयच्या शाखेत ठेवली होती. मात्र १५ ऑक्टोबरला दुपारच्या सुमारास गुडगाववरून त्यांच्या खात्यातून तब्बल ६४५०० रुपये काढण्यात आले. कुणालाही माहिती देता अशाप्रकारे रक्कम उडवल्यामुळे धक्का बसल्याचे संतोष किरनाके यांनी ‘दै. दिव्य मराठी’ला सांगितले आहे. 
 
‘एसबीआय’ने परत केली दोघांना रक्कम 
मे महिन्यात चिरोडीचे शेतकरी नानू चव्हाण यांच्या खात्यातूनही भामट्यांनी लाख ३० हजार रुपये गुडगाव येथील एटीएमवरून उडवले होते. तसेच नवाथेमधील लढ्ढा यांचे ८० हजार उडवले होते. हे प्रकरण दिव्य मराठीने लावून धरले होते. त्यानंतर दीड ते दोन महिन्यांनी या दोघांची रक्कम बँकेने त्यांच्या खात्यावर जमा केली होती. 
 
बातम्या आणखी आहेत...