आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती कृउबासचे व्यवहार होते सुरळीत, अडत घेताच अडत्यांनी केला शेतमालाचा लिलाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शासनाने बाजार समितीच्या आवारातील भाजीपाला फळे नियमन मुक्त केल्यानंतर व्यापाऱ्यांकडून पुकारण्यात आलेल्या बंदचा फारसा परिणाम दिसून आला नाही. सोमवारी येथील बाजार समितीचे व्यवहार नियमित सुरू होते. परंतु खरेदीदारांनी अडत देण्यास नकार दिल्यामुळे काहीसा किरकोळ पेच निर्माण झाला. त्यामुळे अडत्यांनी अडत घेताच आज शेतकऱ्यांच्या मालाचा लिलाव केला.
शासनाने भाजीपाला फळे नियमन मुक्त केल्यानंतर व्यापाऱ्यांकडून याला सध्या विरोध होत आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. सोमवारी येथील बाजारात या बंदचा फारसा परिणाम दिसून आला नाही. शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे शेतमाल विक्रीसाठी आणला होता. अडत्यांनी त्याचा लिलावही केला. परंतु येथील भाजी बाजारात खरेदीदार हा किरकोळ व्यावसायिक असल्यामुळे त्यांनी अडत्यांना अडत देण्यास नकार दिला. त्यामुळे अडत्यांची पंचाईत झाली. याबाबत अडत्यांनी आपली भूमिका आज बाजार समिती व्यवस्थापनाकडे मांडली. यामुळे अडत्यांचा काही काळ गोंधळही उडाला. बाजारात आज दररोजप्रमाणे भाजीपाल्याची आवक होती. सुमारे १८०० टन भाज्यांची आवक झाली.

संपाचा परिणाम नाही
^कृषी उत्पन्नबाजार समितीत बाजार सुरू होता. संपाचा कोणताही परिणाम झालेला नाही. दैनंदीन व्यवहार झाले. उद्याही बाजार सुरू राहील. राजेशइंगोले, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती.

अडत घेतली नाही
^शेतकऱ्यांचा मालाचा लिलाव झाला, शेतकऱ्यांकडून कोणतीही अडत घेण्यात आलेली नाही. किरकोळ खरेदीदारांनी अडत देण्यास नकार दिल्याने पेच निर्माण झाला. त्यामुळे खरेदीदारांनी जर अडत दिली नाही तर आमच्या अडचणीचे होणार आहे. राजूमेत्रे, सचिव भाजीपाला अडते असोशिएसन.
बातम्या आणखी आहेत...