आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाजपासून अमरावती बाजार समिती सुरू, कृउबासच्या आवारातील ‘ते’ वादग्रस्त घर हटवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बाजार समितीमध्ये काम करणाऱ्या दोन हमालांना एकाने शुक्रवारी (दि. ३) रात्री मारहाण केली होती. मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे घर बाजार समितीच्या जागेत होते. ते घर हटवून त्याला बाजार समितीच्या बाहेर काढण्याची मागणी माथाडी मजदूर संघटनेने करून हमालांनी शनिवारपासून कामबंद केले होते. त्यामुळेच मंगळवारी (दि. ७) सकाळी ते घर पोलिस सुरक्षेत काढण्यात आले. त्यामुळे हमाल बंधूनी आपले कामबंद मागे घेतल्याने मंगळवारी दुपारपासून काम सुरू झाले आहे. बुधवारपासून (दि. ८) बाजार समितीचे व्यवहार सुरळीत होणार आहे. 
 
हमालांना मारहाण झाल्यानंतर कामबंदचा निर्णय माथाडी मजदूर कामगार संघटेनेने घेतला. त्यांच्या बंदला बाजार समितीत कार्यरत विविधपाच संघटनांनी समर्थन दर्शवले होते. कारण ज्याने हमालांना मारहाण केली. त्यामुळे याबाबीची गंभीर दाखल प्रशासन संचालक मंडळाने घेतली. दरम्यान संचालक मंडळाने सदर घर हटवण्याचा निर्णय घेतला. घर हटवताना कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून संचालक मंडळांनी पोलिस सुरक्षा मागितली होती. ती सुरक्षा पोलिसांनी दिली. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून पोलिसांच्या सुरक्षेत संचालक मंडळ बाजार समितीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ते घर हटवण्यात आले. मात्र हे काम पुर्ण होईस्तोवर दुपारी १२ वाजले होते. काम पुर्ण होताच हमालांनी कामबंद मागे घेऊन कामावर हजर झाले. बुधवारपासून बाजार समितीचे काम पुर्ववत सुरू होणार आहे. चोख पोेलिस बंदोबस्तात ते वादग्रस्त घर पाडण्यात आले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...