आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : अमरावतीत काँग्रेस शहराध्यक्षाला बदडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहर काँग्रेस अध्यक्ष संजय अकर्ते शहर महिला काँग्रेस अध्यक्षा अर्चना सवाई यांना मारहाण केली. - Divya Marathi
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहर काँग्रेस अध्यक्ष संजय अकर्ते शहर महिला काँग्रेस अध्यक्षा अर्चना सवाई यांना मारहाण केली.
अमरावती : महापालिका निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी फेब्रुवारीला शेवटच्या दिवशी बी फाॅर्मवरून उद्भवलेल्या वादातून हाॅटेल ग्रॅन्ड महेफील येथे एनएसयुआय, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहर काँग्रेस अध्यक्ष संजय अकर्ते शहर महिला काँग्रेस अध्यक्षा अर्चना सवाई यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. यात अकर्ते यांना दुखापत झाली असून, सवाई यांच्याही कपाळावर बेंड आले आहे. 

गडगडेश्वर प्रभागातून राजा बागडे यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तिकीट नाकारल्यामुळे एन एस यु आय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला.त्यातूनच हा मारहाणीचा प्रकार घडल्याची शहरात जोरदार चर्चा आहे. यामागे काही असंतुष्टांचा ही हात असल्याचे बोलले जात आहे. हाॅटेल ग्रॅन्ड महेफिल येथील खोली.क्र. २०२ मध्ये शहर काँग्रेस अध्यक्ष संजय अकर्ते, महिला अध्यक्ष अर्चन सवाई, किशोर बोरकर, नितीन मोहोड, अमोल ठाकरे इतर पदाधिकारी बी फाॅर्मचे वाटप करताना एनएसयुआय, युवक काँग्रेस कार्यकर्ते राहुल तायडे, संजय बोबडे, रवि रायबोले, वैभव वानखडे आणि अक्षय भुयार तेथे आले. त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत वाद घालून बी फाॅर्म हिसकले. यातूनच मग वाद निर्माण झाला. फाॅर्म हिसकणाऱ्यांना मज्जाव केल्याने अकर्ते यांना मारहाण केली. त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली. कपाळातून रक्त वाहत होते. त्यांच्या शरीरावरही मारहाणीच्या खुणा होत्या. या मारहाणीत त्यांचे कपडेही फाटले. मध्यस्थीचा प्रयत्न करणाऱ्या सवाई यांच्या चेहऱ्यालाही मार बसला. मारहाण करणाऱ्यांनी फाॅर्म घेऊन पळण्याचा प्रयत्न केला परंतु, इतर कार्यकर्ते धावल्याने तो यशस्वी होऊ शकला नाही. या मारहाणीची तक्रार अकर्ते यांनी पोलिसांकडे केल्यानंतर पोलिस हॉटेलमध्ये पोहोचले त्यांना उपचारासाठी इर्विन रुग्णालयात घेऊन गेले. 

असंतुष्टांद्वारे वचपा काढण्याचा प्रयत्न 
बी फाॅर्म वाटप करीत असताना मला मारहाण करून असंतुष्टांनी वचपा काढला. प्रचंड लाथा, बुक्क्या माझ्या छाती पोटावर मारण्यात आल्या. तसेच माझ्या चेहऱ्यावरही मारहाण करण्यात आली.मला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या सवाई यांनाही त्यांनी मारहाण केली, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) उपचारार्थ दाखल केल्यानंतर शहर काँग्रेस अध्यक्ष अकर्ते यांनी दिली. 
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा या घटनेचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...