आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मैत्रेय’ची आणखी शंभर कोटींची संपत्ती उजेडात! ३२ कोटींच्या मालमत्तेवर प्राधिकाऱ्यासाठी पत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मैत्रेयची नव्याने जवळपास १०० कोटींची मालमत्ता उघड होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. उघड झालेल्या मालमत्तेपैकी आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत एकूण ४७ कोटींच्या मालमत्तेवर सक्षम प्राधिकारी नेमण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे. गुंतवणूकदारांची फसगत झाल्याप्रकरणी मैत्रेयविरुद्ध अमरावतीत गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू झाला होता. पोलिसांनी तपासादरम्यान यापूर्वीच मैत्रेयची राज्यात असलेली जवळपास ११५ कोटींची मालमत्ता उघड केली होती, हे विशेष.
गुंतवणूकदारांना कमी दिवसांत गुंतवणूक केलेल्या रकमेच्या तुलनेत अधिक पैसा मालमत्ता देण्याचे आमिष दाखवून ‘मैत्रेय’ने राज्यातील विविध शहरांत हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत. दरम्यान, अमरावती शहरात गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने मैत्रेय ग्रुपची राज्यातील विविध शहरांत असलेली तब्बल ११५ कोटी ८८ लाख रुपयांची स्थावर जंगम मालमत्ता यापूर्वीच उघड केली आहे. ही मालमत्ता यापूर्वी कोठेही उघड झालेली नाही.
नव्याने उघड १०० कोटी
१)मुंबईमधील खार भागात असलेले अपार्टमेंट २) सांगलीमधील अपार्टमेंट ३) कर्नाटकमधील अथनी येथील रहिवासी संकुल ४) कच्छ, गुजरात ५) शिर्डी येथील ब्रह्मयोग संकुल ६) मुंबईला लागून असलेला ‘अरण्य’ परिसर ७) गुजरातमधील बडोदा शहरात बांधण्यात आलेले १२० बंगले, या ठिकाणी एका बंगल्याची किंमत जवळपास कोटीच्या घरात असण्याची शक्यता. ८) मंुबईतील भोईसर परिसरात ‘मामाचा गाव’ नामक रिसॉर्ट आणि ९) मिनरल वॉटरची कंपनी ही मालमत्ता अमरावती आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी नव्याने उघड केली असून याची किंमत जवळपास १०० ते १२५ कोटींच्या आसपास.
बातम्या आणखी आहेत...