आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी फेब्रुवारीला मतदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्यातील विधान परिषदेच्या दोन पदवीधर आणि तीन शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने बुधवारी घोषित केला. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाकरिता फेब्रुवारी २०१७ ला मतदान होईल. १० जानेवारीला अधिसूचना प्रकाशित होईल. १० ते १७ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी आहे. १८ जानेवारीला अर्जांची छाननी, अर्ज परत घेण्याची अंतिम तारीख २० जानेवारी आहे. फेब्रुवारीला सकाळी ते या वेळेत मतदान फेब्रुवारीला मतमोजणी होईल. अमरावती पदवीधरचे विद्यमान राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, नाशिकचे पदवीधरचे सुधीर तांबे, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे विक्रम काळे, कोकण शिक्षक मतदारसंघाचे रामनाथ मोते, आणि नागपूर शिक्षक मतदारसंघाचे नागो गाणार यांचा कालावधी डिसेंबर २०१६ ला संपला आहे. 
बातम्या आणखी आहेत...