आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amravati Municipal Corporation Notice To Sum Organizations And Hotels

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॉटेलसह १३ प्रतिष्ठानांना मनपाने बजावल्या नोटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- विनापरवानगी अतिरिक्त बांधकाम केल्याप्रकरणी महापालिकेने शहरातील नामांकित हॉटेलसह १३ प्रतिष्ठानांना नोटीस बजावल्या असून, या १३ प्रतिष्ठानांमध्ये शाळा-महाविद्यालयांचाही समावेश आहे. दरम्यान, जप्ती कारवाईची नोटीस मिळताच हॉटेल रामगिरीकडून १५ लाख ९१ हजार ४५५ रुपयांचा भरणा महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे करण्यात आला आहे.
महापालिकेची परवानगी घेता करण्यात आलेल्या अवैध बांधकामाकडे महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी लक्ष केंद्रित केले आहे. आयुक्तांच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आल्यानंतर हॉटेल रामगिरीच्या मालकाकडून दंडाचा भरणा करण्यात आला असला तरी कॅम्पस्थित हॉटेल महफिल इन, महफिल लॉन, ग्रँड महफिल यांच्याकडून मात्र दंडाचा भरणा करण्यात आलेला नसल्याची माहिती आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विनापरवानगी करण्यात आलेल्या बांधकामाची तपासणी महापालिकेकडून करण्यात आली होती. विविध प्रतिष्ठानांचे मोजमाप करून त्यातील िवनापरवानगी बांधकामाचा अहवाल महापालिकेच्या नगररचना विभागाने सादर केला आहे. अतिरिक्त तसेच अवैधपणे करण्यात आलेल्या बांधकामावर दंडाची रक्कम महापालिकेच्या मालमत्ता कर निर्धारण विभागाकडून आकारली जात आहे. शिवाय अतिरिक्त बांधकाम करणाऱ्या प्रतिष्ठानांना नोटीस देण्याचे सत्र महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. हॉटेलनंतर आता महाविद्यालय शाळा आदींकडे लक्ष केंद्रित केले अाहे. झोन क्रमांक दोनमधील तीन महाविद्यालय दोन शाळांना याबाबत प्राथमिक स्तरावर नोटीस देण्यात आली आहे.
या प्रतिष्ठानांना बजावल्या नोटीस

प्रतिष्ठानमागणी तारीख
-विद्याभारतीमहाविद्यालय २२६७६३ --
-एचव्हीपीएम डीग्री कॉलेज ११०४१२ २५-८-१५
-एचव्हीपीएम वर्कशॉप २८७०५ २५-८-१५
-एचव्हीपीएम कँटीन २१६२७ २५-८-१५
-एचव्हीपीएम एमसीए कॉलेज २१०९६ २५-८-१५
-एचव्हीपीएम नॅचरोपॅथी ९१५० २५-८-१५
-एचव्हीपीएम इंजि. कॉलेज ४१३९८३ २५-८-१५
- ब्रजलाल बियाणी महाविद्यालय १९६२०५ २७-८-१५
-सामरा इंग्लिश हायस्कूल २२०८६० २७-८-१५
-मोहनलाल सामरा प्राय. शाळा १४७६९६ २७-८-१५

अशी आहे दंडात्मक कारवाईची प्रक्रिया
विनापरवानगीअतिरिक्त बांधकाम केलेल्या प्रतिष्ठानाला नोटीस प्राप्त झाल्याच्या १५ दिवसांच्या आत संबंधित झोनच्या सहायक आयुक्तांकडे कागदपत्र सादर करणे गरजेचे आहे. दंडाचा भरणा करत अथवा कागदपत्र प्रस्तुत करत प्रकरण निकाली काढता येते. १५ दिवसांमध्ये कागदपत्र सादर करणे अथवा दंडाचा भरणा केल्यास ती रक्कम कायम धरली जाते. त्यानंतर केवळ आयुक्तांकडे अपिलात जाता येते.