आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या बोटचेप्या धोरणाचा ठरला बळी, अकोली खून प्रकरणात दोन पीएसआयसह तिघे निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अकोली येथील अतिक्रमण पाडण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी दिलेल्या निवेदनावर कोणतीच कारवाई केल्यामुळे खुनाची घटना घडल्याचा आरोप करीत शेकडो नागरिकांनी बुधवार, जून रोजी महापालिकेवर धडक दिली. किमान आता तरी संबंधित अतिक्रमण काढण्यात यावे, अशी संतप्त मागणी करण्यात आली. दरम्यान, महापालिका प्रशासनाच्या बोटचेप्या धोरणाविरोधात नागरिकांनी कमालीचा संताप व्यक्त केला.
अकोली येथील सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते. संबंधित अतिक्रमण हटवण्याच्या वादातून मागील काही दिवसांपासून येथे दोन गटांच्या नागरिकांमध्ये वाद निर्माण झाला होता. याच वादाचा उद्रेक होऊन शनिवार, विशिष्ट समुदायाच्या गटाने तलवार, गुप्तीने सशस्त्र हल्ला केला होता. या हल्ल्यात सुरेंद्र वानखडे यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे बंधू रवींद्र वानखडे गंभीर जखमी झालेे होते. दरम्यान, संबंधित अतिक्रमणापूर्वी येथे राष्ट्रीय उत्सवदेखील साजरे केले जात होते. मात्र, या जागेवर झालेल्या अतिक्रमणानंतर गावातील राष्ट्रीय उत्सवही बंद झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी गावातील ही एकमेव जागा असल्याने अतिक्रमण काढण्याची मागणी मागील एक ते दोन वर्षांपासून परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. यासाठी सहा महिन्यांपूर्वी महापालिकेकडे निवेदनही देण्यात आले होते. परंतु, प्रशासनाने याबाबत कोणतीच कारवाई करता बोटचेपे धोरण अवलंबल्याचा नागरिकांचा आरोप आहे. दरम्यान, संबंधित अतिक्रमण दूर केले असते, तर सुरेंद्रची हत्या टळली असती, असा आरोप करीत अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी बुधवारी शेकडो नागरिकांनी बुधवारी दुपारच्या सुमारास मनपावर धडक दिली. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे तरुणाचा जीव गेल्याचा आरोप करीत अकोली परिसरातील संतप्त महिलांनी महापालिकेत आज रौद्ररूप धारण केले. नागरिकांकडून करण्यात आलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे महापालिका आयुक्त हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले. संबंधित अतिक्रमणाचा त्रास नागरिकांना होत असल्याचे या वेळी आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. नागरिकांनी गणेश कुत्तरमारे यांना बोलवा, अशी मागणीदेखील निवेदन देताना केली. मात्र, आयुक्तांनी मात्र अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्याच्या बचावाची भूमिका घेतल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला. त्यावर अतिक्रमण विभागाकडून का कारवाई करण्यात आली नाही, असा संतप्त सवालही या वेळी नागरिकांनी आयुक्त पवार यांना केला. या प्रकरणात आयुक्त पवार यांनी काही दिवसांचा अवधी मागितला. या विषयाला घेऊन महापालिकेची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आयुक्त हेमंत पवार यांचा भ्रमणध्वनी उत्तर देत नव्हता.

मनपाच्या शाळेत अतिक्रमण : अकोलीयेथील महापालिकेच्या शाळेतदेखील विशिष्ट समुदायाकडून अतिक्रमण करण्यात आल्याची बाब नागरिकांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहण स्तंभालादेखील अतिक्रमणाचा विळखा असल्याने राष्ट्रीय उत्सवात खंड पडल्याची तक्रार करण्यात आली आहे.

तक्रारींवर पोलिस कारवाई नाही : अकोलीयेथील युवकाच्या हत्येनंतर तेथील महिला पुरुषांना धमक्या दिल्या जात असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. निवेदन देताना पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडे महिलांकडून ही माहिती देण्यात आली. धमक्यांच्या तक्रारीवर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले.

मनपाला पोलिस कुमक : महापालिकाआयुक्तांना निवेदन दिल्यानंतर संतप्त नागरिकांनी पोलिस आयुक्तांकडे धाव घेऊन सुरक्षा पुरवण्यासंदर्भात निवेदन दिले.

अतिक्रमणामुळे वाद
^अकोली येथील वादाची सुरुवात अतिक्रमणापासून झाली. मनपात येण्यापूर्वी गावठाण असताना येथील सार्वजनिक जागेची माहिती शासन दरबारी आहे. निवेदन देऊनही कारवाई करण्यात आलेली नाही. वसंत गौरखेडे, नागरिक.

अतिक्रमणाचा त्रास
^सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणाचा नागरिकांना त्रास होत आहे. दुकानाचे विविध साहित्यदेखील रस्त्यावर ठेवले जाते. याची माहिती मनपाला देण्यात आली. प्रवीण बागडे, नागरिक.
खोलापुरीगेट पोलिस ठाणेच्या हद्दीत असलेल्या अकोली गावात पाच दिवसांपूर्वी एका गटाने हल्ला करून सुरेंद्र वासुदेव वानखडे यांचा खून केला. याच दोन गटांत महिन्यांपूर्वी हाणामारी झाली होती. त्या वेळी वानखडे गटाने केलेल्या हल्ल्यात आता हल्ला करणाऱ्या गटातील एक जण गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तसेच ज्या अधिकाऱ्याची बीट आहे, त्यांनी या प्रकरणात योग्य लक्ष देऊन भविष्यात या दोन गटांत वाद होऊ नये, यासाठी आवश्यक कारवाई करणे अपेक्षित होती. मात्र, तशी कारवाई झाली नसल्याचा ठपका ठेवून खोलापुरी गेटला कार्यरत असलेले पीएसआय खोपिआ कर्मचारी या तिघांना निलंबित केले. ही कारवाई पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी बुधवार, जूनला केली आहे.
पीएसआय अमोल मुळे, पीएसआय रावसाहेब धामणकर आणि खोपिआ कर्मचारी संजय धर्माळे, असे निलंबित झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्याचे नाव आहे. अकोलीत मार्च २०१६ ला दोन गटांत हल्ला झाला होता. त्या वेळी वानखडे गटाने विरुद्ध गटातील एकावर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर अजूनही उपचार सुरू आहे. दरम्यान त्या प्रकरणात सुरेंद्र वानखडे इतरांना अटक पोलिसांनी केली होती. कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर काही दिवसांतच सुरेंद्र वानखडे त्यांचा भाऊ रवींद्र या दोघांवर घरात जाऊन हल्ला चढवला. यामध्ये सुरेंद्र यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दोन गटांत मागील अनेक महिन्यांपासून धुसफूस सुरू आहे. त्यातही हे दोन्ही गट एकाच परिसरात राहतात, या सर्व पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलिसांचे लक्ष अपेक्षित होते. मार्चमध्ये झालेल्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने तसेच ज्या अधिकाऱ्यांकडे बीट आहे, या दोन्ही जबाबदाऱ्या पीएसआय रावसाहेब धामणकर पीएसआय अमोल मुळे यांच्याकडे होत्या. तसेच खोपिआ कर्मचारी संजय धर्माळे यांनीसुद्धा योग्य जबाबदारी पार पाडली नाही, असा ठपका ठेवण्यात आला. याच वेळी ठाण्याचे प्रमुख म्हणून या प्रकरणात योग्य कामगिरी बजावल्यामुळे ठाणेदार राध्येश्याम शर्मा यांची दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्यासंदर्भात नोटीस देऊन लवकरच वेतनवाढ रोखण्याची कारवाई होणार आहे.

प्रकरण योग्य हाताळले नाही
^अकोली प्रकरण खोलापुरी गेट पोलिसांनी योग्य पद्धतीने हाताळले नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच बीट अधिकारी, जुन्या प्रकरणाचे तपासअधिकारी तसेच खोपिआ कर्मचारी असे दोन पीएसआय एक कर्मचारी निलंबित झाले आहे. तसेच ठाणेदारांना दोन वर्षे वेतनवाढ थांबवण्यात आली. मोरेश्वर आत्राम, पोलिसउपायुक्त.

बातम्या आणखी आहेत...