आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती महापालिका: महापौर-उपमहापौर; आज होणार निवड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापौर उपमहापौर पदासाठी महापालिकेच्या सभागृहात गुरुवार (९ मार्च) सकाळी ११ वाजता निवडणूक घेतली जाणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून दोन्ही पदाच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सभागृहात बहुमत असल्याने महापौर पदी संजय नरवणे तर महापौर पदावर संध्या टिकले यांच्या नावाची घोषणा तेवढीच शिल्लक असल्याचे राजकीय चित्र आहे. 
 
महापालिकेत एकहाती सत्ता प्राप्त झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे महापौर म्हणून संजय नरवणे तर उपमहापौर पदासाठी संध्या टिकले यांचे नाव कोअर कमिटीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. तिजोरीची चाबी असलेल्या स्थायी समिती सभापती पदासाठी तूषार भारतीय तर पक्षनेता म्हणून सुनील काळे, उपपक्षनेता म्हणून विवेक कलोती यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. महापौर, उपमहापौर यांच्या निवडीसह पक्षनेते पदी सुनीळ काळे, उपपक्षनेता विवेक कलोती यांची तर विरोधी पक्ष नेत्याची निवड काँग्रेककडून केली जाणार आहे. 

शिवाय स्थायी समितीवर पाठविण्यासाठी पक्षीय बलाबलानूसार १६ सदस्यांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. अमरावतीकर जनतेने भारतीय जनता पक्षाच्या हाती एकहाती सत्ता दिली आहे. दोन्ही पदांवर भाजपचे शिलेदार विराजमान होणार असल्याने नवीन आव्हाने त्यांच्यासमोर राहणार आहे. काँग्रेसने शोभा शिंदे यांना महापौर पदाच्या निवडणुकीत रिंगणात उतरविले आहे. उपमहापौर पदासाठी भाजपच्या संध्या टिकले, काँग्रेसचे अब्दूल वसीम मजीद, एमआयएमचे अफजल हुसैन मुबारक हुसैन आदी निवडणूक रिंगणात आहे. 
 
स्वीकृत सदस्यांची घोषणा अधांतरी 
महापौर-उपमहापौरपद निवडीसाठी गुरुवारी होणाऱ्या विशेष सभेत स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा अपेक्षीत आहे. मात्र भारतीय जनता पक्षाकडून सभागृहात जाणाऱ्या स्वीकृत सदस्यांच्या नावांवर एकमत झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे स्वीकृत सदस्यांच्या निवडीची घोषणा टळण्याची शक्यता आहे. 
बातम्या आणखी आहेत...