आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असताना तेथील कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले. तिथे काम करताना ही समस्या समजून घेणे उपाय आखणे, त्याची अंमलबजावणी करणे या कामांचा अनुभव मिळाला. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातही मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यास प्राथमिकता देणार असल्याचे नव्याने येथे रुजू झालेले जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी बुधवारी (दि. २६) पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
जिल्हाधिकारी बबांगर यांनी आज जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

आजवर आम्ही मेळघाटातच कुपोषण आहे असे एेकत होतो. पालघर जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर पहिला जिल्हाधिकारी म्हणून काम करताना अधिक आव्हाने होती. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे आव्हान कुपोषणाचे होते. त्यामुळे या प्रश्नावर बराच वेळ खर्च करावा लागला. तसेच कुपोषणाची समस्या जवळून पाहता आली. अमरावतीचा जिल्हाधिकारी म्हणून मेळघाटातील कुपोषणाच्या समस्या संबंधित इतर बाबींचा प्राधान्याने विचार करणार आहे. अमरावती हे विभागीय ठिकाण असून येथील प्रशासनाला मोठी परंपरा आहे. अशा जिल्ह्यात काम करायला मिळणे हे मी भाग्याचे मानतो, असेही बांगर म्हणाले. 
 
अभिजीत बांगर ठरले ३७ वे जिल्हाधिकारी 
अभिजीतबांगर हे अमरावती जिल्ह्याचे ३७ वे जिल्हाधिकारी आहेत. ते मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील असून अनेक वर्षे त्यांचे वास्तव्य बार्शी येथे होते. त्यांनी पुणे येथे अर्थशास्त्र या विषयात एम. ए. केले आहे काही काळ तेथील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले आहे. बांगर २००८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी नागपूर येथे जिल्हा सहायक अधिकारी, रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले. त्याचप्रमाणे, त्यांनी रायगड सातारा येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रत्येकी दोन वर्षे काम केले आहे. पालघर या नवनिर्मित जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी म्हणून ऑगस्ट २०१४ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला तिथे वर्षे महिने काम केले. 

 
बातम्या आणखी आहेत...