आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दुचाकी चोरट्यांसह ‘घरफोड्या’स पकडले, गुन्‍हे शाखा पोलिसांची कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गत काही दिवसांपासून शहरात चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. गुन्हे शाखेच्या एका पथकाने दोन दुचाकीस्वारांना पकडले तर अन्य एका पथकाने एका घरफोड्याला पकडले आहे. या तिघांनाही गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवारी (दि. ११) पकडले आहे. संजय विश्वनाथ सुखदेवे (३४, शारदानगर, बडनेरा) आणि कमलेश वसंत कवडे (२९, रा. बडनेरा) असे पोलिसांनी पकडलेल्या दुचाकी चोरी प्रकरणात पकडलेल्यांची नावे आहेत. याचवेळी एका घरफोडीच्या प्रकरणात निलेश अजाबराव जवंजाळ (२८, रा. पोहरा) याला अटक केली आहे. 

संजय सुखदेवे कमलेश कवडे यांचा सहभाग पोलिसांना दुचाकी चोरीमध्ये आढळून आला होता. त्यामुळे गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांना पकडून चौकशी केली असता त्यांनी शुक्रवारी सायंकाळपर्यंत पोलिसांना तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. दरम्यान यांच्या ताब्यातून पोलिसांनी सहा संशयित दुचाकी जप्त केल्या आहे. त्याने शहरातील गाडगेनगर, राजापेठ परिसरातून दुचाकी चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच निलेश जवंजाळ याला नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीतील एका घरफोडी प्रकरणात ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडूनही या गुन्ह्यांसोबत अन्य गुन्हे उघड होण्याची शक्यता गुन्हे शाखा पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या नेतृत्वात पीएसआय राज चाटे, पीएसआय राम गित्ते त्यांच्या पथकाने केली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...