आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एड्स रोग नियंत्रणात अमरावती अव्वल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील एड्सच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. अमरावती जिल्हा एड्स प्रतिबंधक नियंत्रण कक्षातर्फे प्रभावीपणे एड्ससंदर्भात जनजागृती होत आहे. याच जनजागृतीमुळे राज्यात एड्स प्रतिबंधक नियंत्रणात अमरावती जिल्हा अव्वल आला आहे. अमरावती जिल्ह्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुंबई येथील राज्य एड्स नियंत्रण संस्थेकडून जिल्ह्याला उत्कृष्ट कार्याबद्दल अव्वल क्रमांक दिला आहे. मंगळवारी डिसेंबरला जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून अमरावतीला हा पुरस्कार बहाल करणार आहे.

दरम्यान, याच उल्लेखनीय कामगिरीसाठी मागील वर्षीही अमरावतीला हा पुरस्कार देऊन गौरवले होते. गेल्या वर्षीही अमरावती जिल्हा अव्वलच होता. एड्स जनजागृतीसंदर्भात जिल्हा एड्स प्रतिबंधक नियंत्रण समितीने उपक्रम राबवले जातात. यामुळेच गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील एड्सच्या रुग्णांची संख्या कमी होत असून, ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. एड्स प्रतिबंधक नियंत्रण कक्षाचे कार्यक्रम अधिकारी अजय साखरे हे एड्ससंदर्भात जनजागृती करीत आहेत. मुंबई येथे होणाऱ्या सोहळ्यात साखरे पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाणार आहेत. अमरावती कक्षातर्फे युवा चेतना रथच्या माध्यमातून गावोगावी जाऊन एड्सबद्दल माहिती देण्यात आली. महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी लेट्स टॉक उपक्रम तर या वर्षी होणाऱ्या एड्सदिनी मिनी मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. या उपक्रमासाठीच अमरावतीला हा पुरस्कार बहाल करणार आहे.

राज्यातून सहा जणांना मिळाला क्रमांक
एड्सजनजागृतीसंदर्भात राज्यातील जिल्हास्तरावर राबवण्यात येणारे उल्लेखनीय काम बघता अमरावतीला अव्वल क्रमांक दिला आहे. त्यापाठोपाठ भंडारा जिल्ह्यातही एड्सचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. भंडारानंतर, चंद्रपूर तृतीय, लातूरचा चौथा, हिंगोलीला पाचवा तर अकोला जिल्ह्याला सहावा क्रमांक मिळाला आहे. सहापैकी चार हे विदर्भातीलच जिल्हे आहेत, हे उल्लेखनीय.

मुंबई येथे होणार पुरस्कार प्रदान सोहळा
डिसेंबरलामुंबई येथे होणाऱ्या शानदार सोहळ्यात हा पुरस्कार अमरावतीला दिला जाईल. याप्रसंगी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, राज्यमंत्री प्रा. राम शिंदे, लोकसभा सदस्य अरविंद सावंत, विधानसभा सदस्य अजय चौधरी, आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक, एड्स नियंत्रक संस्थेच्या संचालक आय. ए. कुंदन, आरोग्य सेवा संचालक डॉ. सतीश पवार मुकुंद डिग्गीकर आदी उपस्थित राहतील.