आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: अल्पसंख्याकबहुल शाळांना दोन लाखांचे अनुदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
अमरावती- अल्पसंख्याक विभागातर्फे अल्पसंख्याकबहुल शासन मान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था अपंग शाळा यांच्यासाठी पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान देण्यात येते. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे. या योजनेनुसार शाळेच्या इमारतीचे नुतनीकरण डागडुजी, ग्रंथालय, प्रयोगशाळा, प्रशासनगृह उभारणे इन्व्हर्टरची सुविधा, शिक्षण साहित्य, एल. सी. डी. प्रोजेक्टर, इंग्रजी लँग्वेज लॅब, शुध्द पेयजल व्यवस्था, झेरॉक्स मशीन, संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर यासाठी दोन लाख रुपये अनुदान मिळेल. योजनेच्या अटीनुसार, शाळेत अल्पसंख्याक समाजाचे किमान ७० टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. संस्थांनी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन शाखेत १८ सप्टेंबर पर्यंत सादर करावा. अर्जाचा नमुना http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे कळविण्यात आले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...