आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती विद्यापीठात स्थापन होणार शाश्वत विकास केंद्र!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शाश्वत विकास केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. विद्यापीठात गठीत समितीने केंद्राबाबत संपूर्ण अहवाल व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवला जाणार आहे. तीन वर्षासाठी शिक्षक कर्मचाऱ्यांची करार पद्धतीने नेमणूक करण्याचे समितीने शिफारसीत नमूद केले आहे. 
 
शाश्वत विकास केंद्राचा प्रस्ताव तयार करण्यासाठी नागपूर येथील डॉ. कपील चंद्रायान यांची मार्गदर्शन घेण्याकरीता निवड करण्यात आली होती. प्रस्ताव तयार करण्याकरीता १३ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास आेमनवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शाश्वत विकास केंद्र निर्मितीचा तयार केलेला प्रस्ताव आगामी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवल्या जाणार आहे. 
 
नागपूर येथील शारदा कन्सलटन्सीचे डॉ. कपील चंद्रायान यांनी समितीच्या २५ एप्रिल १७ रोजी झालेल्या बैठकीत केंद्राचा प्रस्ताव तयार करण्याची रुपरेषा पॉवर प्वॉइंट प्रेझेनटेशनद्वारे सादर केली. या केंद्राकरीता लागणारा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग हा वर्षांच्या करारावर नेमणे तसेच पहिल्या वर्षातील संपूर्ण खर्च हा केंद्र शासनाला देण्याचा त्यानंतर चालणाऱ्या विविध उपक्रमातून आत्मनिर्भर होण्याची बाब प्रस्तावात नमूद करण्यात आली आहे. 
 
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतुदीनुसार विविध प्राधिकारीणींची मान्यता घेणे महत्वाचे असल्याने केंद्र आरंभ होण्यास विलंब होणार असल्याची माहिती समोर आली होती. कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी देखील शाश्वत विकास केंद्र निर्माण करण्यास हिरवी झेंडी दिल्याची माहिती आहे. मात्र केंद्र निर्मिती करण्यासाठी कन्सलटन्सी सर्व्हीस घ्यावी लागणार असल्याने त्यास व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे बंधनकारक आहे. शिवाय प्रस्ताव तयार करण्यासाठी येणाऱ्या खर्चास देखील व्यवस्थापन परिषदेची अनुमती असणे गरजेचे आहे. त्यामुळे आगामी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या विषयावर चर्चा केली जाणार आहे. 
 
विद्यापीठ समितीत यांचा आहे समावेश 
- डॉ.एस. के. ओमनवार, भौतिकशास्त्रविभाग प्रमुख - अध्यक्ष 
- डॉ.एम. के. रॉय, बायाे टेक्नालॉजीविभाग प्रमुख - सदस्य 
- डॉ.मनोज तायडे, मराठी विभागप्रमुख - सदस्य 
- डॉ.एस. व्ही. डुडुल, उपयोजितपरमाणू विभाग प्रमुख - सदस्य 
- डॉ.सी. के. देशमुख, प्राणिशास्त्रविभाग प्रमुख - सदस्य 
- डॉ.आर. एस. सपकाळ, सहयोगीप्राध्यापक केमीकल टेक्नालॉजी- सदस्य 
- डॉ.पी. ए. वाडेगावकर, प्राध्यापकबायो टेक्नालॉजी - सदस्य 
- डॉ.ए. के. श्रीवास्तव, प्राध्यापकभूगर्भशास्त्र - सदस्य 
- डॉ.प्रशांत गावंडे, सहाय्यकप्राध्यापक वनपस्तीशास्त्र -सदस्य 
- डॉ.ए. एम. असनारे, संचालकशारीरिक शिक्षण रंजन मंडळ - सदस्य 
- डॉ.निरज घनवटे, सहायकप्राध्यापक सुक्ष्मजिवशास्त्र - सदस्य 
- एस.जी. रोडे कार्यकारी अभियंता- सदस्य 
- डॉ.कपील चंद्रायान, नागपूर- सदस्य 
बातम्या आणखी आहेत...