आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय स्पोर्टस डान्समध्ये अमरावतीला कांस्य पदक, ऐतिहासिक अंबानगरीचा दरारा राखला कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्यस्तरीय सबज्युनिअर स्पोर्टस डान्स स्पर्धेत अमरावती जिल्हा संघाने तिसऱ्या स्थानासह कांस्यपदक पटकावले. स्पोर्टस डान्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्र जालना शहर संघटनेद्वारे आयोजित तिसऱ्या सबज्युनिअर राज्यस्तरीय स्पर्धेचे नुकतेच कृष्णाबाई फुलंबीकर नाट्यगृह जालना येथे आयोजन करण्यात आले होते. 

राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी अमरावती जिल्हा संघाची निवड चाचणी घेण्यात आली हाेती. यातून उत्कृष्ट संघाची निवड करून तो स्पर्धेसाठी पाठवण्यात आला होता. संपूर्ण संघातील खेळाडूंनी दणकेबाज कामगिरी करून यश संपादन केले. 

अमरावती संघात पाच ग्रुप तसेच तीन सोलाे (क्लासिकल, फोट, वेस्टर्न) सहभागी झाले होते. सोलो क्लासिकलमध्ये मानसी कापगतेने द्वितीय, हर्षिता पुंड अर्णव चौधरी सहभागी झाले होते. पहिला ग्रुप विश्वभारती पब्लिक स्कूल डान्स फोकमध्ये मुलांमध्ये तन्वेश गायकवाड, दिपांशू पावडे, सिद्धांत वानखडे, अंश मालविय, ओम राणे, मधूर टावरी, ऐश्वर्य बुरंदे, आराध्य महात्मे यांनी देखणी सादरीकर करून प्रथम क्रमांक पटकावला. 

दुसरा ग्रुप विश्वभारती पब्लिक स्कूल डान्स फोक मुलींमध्ये श्रावणी वानखडे, अनन्या खेडकर, जाई देशमुख, तेजस्विनी पंजई, अभिरी सेन, आर्या वाजपेयी, तृषा भागवतकर, हर्षिता पुंड यांनी जेतेपद पटकावले. 

तिसरा ग्रुप विश्वभारती पब्लिक स्कूल डान्स फोक मुलांमध्ये निरंजन गांजरे, श्रावण मालणकर, रुद्र कणसे, आर्यन पारदशिंदे, कार्तिक राणे यांनीही सोनेरी पदकावर ताबा मिळवला. 

चौथा ग्रुप विश्वभारती पब्लिक स्कूल मुलींच्या फोक डान्स ग्रुपनेने रौप्यपदक जिंकले. या संघात आरोही शुक्ला, श्रृष्टी साव, पलक बकाले,राधा पाटील, अभिलाषा कनकुले, प्रिया येवले, इरा जाठेचा समावेश होता. पाचवा ग्रुप राॅयल अकॅडमी वेस्टर्न मिक्स डान्समध्ये कौशल शर्मा, कार्तिक पोकडे, अमन झा, राम बोरडे, गौरी बेहरे, सायली देशमुख यांनी अव्वल स्थान बळकावले. 

अंबानगरीतील नर्तकांची पदकांची ‘हॅट्ट्रिक’: अंबानगरीतीलनर्तकांनी तिन्ही स्पर्धांमध्ये यश संपादन करून पदकांची कमाई केली आहे. याआधी अहमदनगर येथील स्पर्धेत सुवर्ण, कोल्हापूरच्या दुसऱ्या सबज्युनिअर स्पर्धेतही जेतेपद पटकावणाऱ्या अमरावती जिल्हा स्पोर्टस डान्स संघाने यंदाच्या तिसऱ्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...