आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 5 वर्षांनंतर झाले होते मूल, मृत्यूच्या 2 तासांपूर्वीच काढले होते बाळाचे फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पीडीएमसीमधील एनआयसीयूमध्ये उपचार सुरू असलेल्या चार बालकांचा एकावेळी मृत्यू झाला. या घटनेवर विश्वास बसत नाही मात्र खरं आहे. कश्यामुळे, कोणाची चूक, या बाबी अजून पुढे आल्या नाहीत. मात्र अकस्मितपणे घडलेल्या घटनेने बाळाच्या आई वडीलांसह संपूर्ण नातेवाईकांना धक्का बसला आहे. अजुनही त्यांचा आक्रोष सुरू आहे. या चारपैकी कावरे दाम्पत्याला तर तब्बल पाच वर्षांनंतर बाळ झाले होते. घरात पाच वर्षांनी आलेल्या नवीन पाहुण्यासाठी तयारी सुरू झाली. मात्र, हा पाच वर्षांनतर आलेला पाहुणा घर पाहण्यापूर्वीच अवघ्या पाच जगाचा निरोप घेऊन निघून गेला.
 
बाळाची प्रकृती सुधारत होती
बंटी व माधुरी कावरे या दाम्पत्याला लग्नानंतरच हे पहीलेच मुल होते. ते सुध्दा पाच वर्षांनतर झाले होते. माधुरी यांचे पीडीएमसीमध्येच २५ मे रोजी ‘सिझेरीअन’ करून प्रसुती करण्यात आली होती. त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. जन्माच्या वेळी बाळाचे वजन २ किलो ३६० ग्रॅम होते. मात्र बाळाची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्याला एनआयसीयूमध्ये ठेवावे लागणार असल्याचे डॉकटरांनी सांगितले. त्यामुळे २७ मे रोजी दुपारी १ वाजून २१ मिनीटांनी पीडीएमसीच्याच एनआयसीयूमध्ये बाळाला ठेवण्यात आले होते. बाळाची प्रकृती सुधारत होती. 
 
बाळाने दूध घेतले होते
दरम्यान रविवारी (दि. २९) रात्री दहा वाजताच्या सुमारास कावरे यांच्या बाळाला एनआयसीयूमधून बाहेर काढले. नातेवाईकांकडे देण्यात आले. त्यांनतर बाळाला काही वेळ आईकडे ठेवण्यात आले. बाळाने दुध घेतले. यावेळी बाळ सुदृढ असल्याचे नातेवाईकांनी सांगितले, नातेवाईकांनी त्याचे छायाचित्र व व्हीडीओसुध्दा घेतले होते. त्या व्हीडीओमध्येसुध्दा बाळ चांगले असल्याचे दिसत होते. मात्र अकरा वाजेच्या सुमारास बाळाला पुन्हा एनआयसीयूच्या परिचारीकांच्या स्वाधीन करून नातेवाईक त्या ठिकाणांहून निघून गेले. त्यानंतर मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अचानकपणे बालकाची प्रकृती खालावली, अशी माहीती फोनव्दारे नातेवाईकांना देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच बाळ दगावल्याची माहीती नातेवाईकांना मिळाली. 
 
2 तासांत मृत्यू झालाच कसा?
दोन तासांपूर्वी सुस्थितीत असलेले बाळ अचानक दगावले कसे? हा प्रश्न नातेवाईकांसह सर्वांसमोरच कायम आहे. कारण बाळाच्या नातेवाईकांनी सांगितले कि, सोमवारी (दि. ३०) त्याला एनआयसीयूमधून बाहेर काढण्याबाबतही डॉक्टर बोलले होते. मात्र डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीपणामुळेच आमचे बाळ गेले असल्याचा आरोप नातेवाईकांनी करत हंबरडा फोडला होता. 
 
सोमवारीच मिळणार होती सुट्टी
चारपैकी एक बाळ पुजा आशिष घरडे यांचे होते. पुजा यांची शहरातील एका खासगी रुग्णालयात प्रसुती झाली होती. बाळाचे वजन १ किलो ७०० ग्रॅम होते. वजन कमी असल्यामुळेच चिमुकलीला पीडीएमसीच्या एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. २५ मेपासून बाळावर उपचार सुरू होते. सोमवारी बाळाला सुटी मिळणार होती मात्र रविवारी मध्यरात्रीच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमची चिमुकली गेली, असे बाळाचे वडील आशिष घरडे यांनी दिव्य मराठीसोबत बोलताना पाणावल्या डोळ्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...