आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अमृत’च्या गतीने वाढणार शहरातील पाण्याचा गोडवा; शहराला मिळणार नवीन जलकुंभ, पाइपलाइनही!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शासनाच्या अमृत योजनेमुळे शहर पाणी पुरवठा योजनेतील विविध प्रलंबित कामांना गती आली असून, टंचाईची समस्या कमी होणार असल्याने पाण्याचा गोडवा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी तीन वर्षातील निवड लक्षात घेता शहर पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करण्यात आले आहे. लाख ४६ हजार नळ ग्राहकांना पाणी पुरवठा करण्याची क्षमता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून निर्माण केली जात अाहे.

अमरावती महापालिका क्षेत्रात मोर्शी तालुक्यात असलेल्या अप्पर वर्धा प्रकल्पातून पाणी पुरवठा केल्या जातो. अप्पर वर्धा प्रकल्पामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ५८ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले आहे. धरणातून येणारे अशुद्ध पाणी तपोवन येथील जलशुद्धीकरण केंद्र येथे शुद्ध केल्या जाते. त्यानंतर संपूर्ण शहरात पाणी पुरवठा केल्या जातो.
 
शहरातील पाणी पुरवठा योजनेत सुधारणा करणे गरजेचे असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. भविष्यातील पाण्याची निवड लक्षात घेता शासनाने ११४ कोटी ३५ लाख रुपयांची अमृत योजना अमरावती महापालिका क्षेत्रासाठी मंजूर केली. या योजनेतील १६ कोटी रुपये मजीप्राला प्राप्त झाली असून या योजनेतील विविध कामांना सुरुवात करण्यात आली. अप्पर वर्धा प्रकल्पातून शहरात पाणी आणण्यासाठी टाकण्यात आलेली पाइप लाइन जुनी झाल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करणे गरजेचे होते. शिवाय अनेक ठिकाणी व्हाॅल नसल्याने किंवा नादुरुस्त झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत हाेती. ही बाब लक्षात घेता सिंभोरा ते तपोवन जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान असलेल्या एकूण ११२ पैकी तब्बल ६७ व्हॉल मजीप्राकडून तातडीने बदलण्यात आले.
 
ऊर्ध्ववाहीनी गुरुत्व वाहीनीवरील एअर व्हाॅल तसेच स्लुस व्हॉल बसविण्यात आले. शहरात अंतर्गत पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन अत्यंत जुनी झाल्याने ती बदलणे गरजेचे होते. शहरात जवळपास ६० किलो मीटर पाइपलाइन बदलण्याचे कार्य अंतिम टप्पात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याकरीता ४२.१५ कि.मी. करीता ११० २०० मीमी व्यासाची एचडीपीई पाइपचा पुरवठा करण्यात आलेला आहे. त्यापैकी ११० मीमी व्यासाचा एचडीपीई पाइप १.५ कि. मी. पाइप लाइन अंथरण्यात आली आहे. वितरण व्यवस्थेला लागणारे व्हॉल स्पेशल साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. शहराच्या विविध भागात ११ नवीन उंच पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले जाणार आहे.

पाणी पुरवठ्याच्या दृष्टिने महत्वपूर्ण असलेल्या १० जलकुंभाचे कार्य आरंभ करण्यात आले आहे. अमृत योजनेतून विविध विकास कामांनी गती घेतल्याने भविष्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर हाेणार असल्याचे दिसून येत आहे. शासनाकडून उर्वरित निधी तातडीने मिळाल्यास या योजनेतील अन्य कामांना देखील गती मिळण्याची शक्यता आहे.
 
उंच जलकुंभ बांधकामाची स्थिती
बडनेरा जुनीवस्ती येथील २० लाख लीटर क्षमतेची २१ मीटर उंच जलकुंभाचे फाऊंडेशन तसेच जमीन कॉलम पर्यंत कार्य पूर्ण झाले. पार्वती नगर, बेनोडा ट्रेन्च येथील २० लाख लीटर क्षमतेची जलकुंभाच्या डिजाइन ड्रॉईंगला अद्याप मान्यता नाही. मजीप्रा येथील १५ लाख लीटर क्षमतेच्या १८ मीटर उंच टाकीचे खोदकाम पूर्ण झाले. रहाटगाव येथील १५ लाख लीटर क्षमतेची जलकुंभाचे खोदकाम पीसीसी पूर्ण झाले. म्हाडा कॉलनी येथील १० लाख लीटर क्षमतेच्या टाकीचे फाऊंडेशन तर तपोवन येथील पाण्याच्या टाकीचे खोदकाम पूर्ण झाले.
 
अमृतची कामे प्रगतीपथावर
महापालिकाक्षेत्रातवाढीव पाणी पुरवठा योजनेकरीता अमृत योजना मंजूर करण्यात आली आहे. ११४ कोटी रुपयांच्या असलेल्या योजनेसाठी सद्यस्थितीत १६ कोटी रुपये प्राप्त झाले आहे. ११ पैकी १० जलकुंभाचे काम सुरू आहे. तपोवन येथील जलशुद्धीकरणाचे कार्य सुरू आहे. शहरात ६० कि.मी. पाइपलाइनचे काम पूर्णत्वाकडे आहे. सिंभाेरा ते तपोपनपर्यंत पाइपलाइनचे ११२ पैकी ६७ व्हॉल बदलण्यात असून विविध कामे प्रगतीपथावर आहे.’’
- प्रशांत भामरे, कार्यकारी अभियंता मजीप्रा
 
बातम्या आणखी आहेत...