आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून प्रकरण: अंडाकरीच्या क्षुल्लक वादाचा मुशीर ठरला बळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: मंगळवारी आरोपींना चोख पोलिस बंदोबस्तात न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
अमरावती - टांगापाडाव ते गांधी चौक मार्गावरील सुरेश राजगुरे यांच्या हॉटेलमध्ये रविवारी रात्री उमेश आठवलेने अंडाकरीचे पार्सल सांगितले होते. या वेळी राजगुरेने दिलेल्या पार्सलमध्ये अंडाकरीचा रस्सा कमी दिला म्हणून उमेशने सुरेश राजगुरेला मारहाण सुरू केली. या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या मुशीर त्याच्या चार सहकाऱ्यांना उमेश त्याच्या चार सहकाऱ्यांनी हल्ला केला. यामध्ये मुशीरचा नाहक बळी गेला. मंगळवारी (दि. ३) तगड्या पोलिस बंदोबस्तात पाचही मारेकऱ्यांनी न्यायालयात हजर केले होते. या वेळी न्यायालयाने पाचही जणांना नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

चिंटू उर्फ मुशीर आलम नियाज अली (३५) यांचे याच भागात ट्रान्सपोर्टचे कार्यालय आहे. रविवारी रात्री मुशीर, त्यांचे बंधू तनवीर आलम, बाबा मशहम, जिआ अहमद जावेद अहमद हे त्यांच्या कार्यालयात बसले होते. त्यांच्या कार्यालयाजवळच सुरेश राजगुरे यांचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये उमेश आठवलेने अंडाकरीचे पार्सल बनवण्यास सांगितले. राजगुरेने ते बनवले, मात्र त्यामध्ये रस्सा कमी झाला म्हणून उमेशने राजगुरेला मारहाण केली. हा वाद पाहून मुशीर त्यांचे मित्र त्या हॉटेलमध्ये धावले. त्यांनी वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता उमेश त्याच्या सहकाऱ्यांनी मुशीरसह इतर चौघांवर चाकू तलवारीने हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुशीरचा मृत्यू झाला. अंडाकरीचा रस्सा कमी झाला, या क्षुल्लक वादातून हे प्रकरण घडले. पोलिसांनी उमेश आठवलेसह अंकुश सुभाषराव जिरापुरे, भुऱ्या उर्फ नीलेश अशोक आठवले, राजू मांडवे (२५) आणि शुभम तात्यासाहेब जवंजाळ या पाच जणांना अटक केली होती. त्या पाचही जणांना मंगळवारी दुपारी कोतवाली पोलिसांनी न्यायालयात हजर केले. या वेळी न्यायालय परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आमदार डॉ. देशमुख यांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट : सोमवारी आमदार डॉ. सुनील देशमुख काही नागरिकांनी पोलिस आयुक्त व्हटकर यांची भेट घेऊन चर्चा केली.

कॅमेऱ्याचा घेतला आधार
न्यायालय परिसरात मारेकऱ्यांना हजर करते वेळी शेकडोंची गर्दी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी कॅमेरे लावले होते. जवळपास तीन कॅमेऱ्यांचा वापर या वेळी पोलिसांकडून करण्यात आला होता. पोलिसांच्या या कॅमेऱ्यांमुळे गर्दी आपोआपच ओसरली होती.

उमेशला केले होते तडीपार
उमेश आठवलेा हा खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गुंड आहे. एक महिन्यापूर्वी त्याला तडीपार करण्याचे आदेश काढण्यात आले, असे खोलापुरी गेटचे ठाणेदार कुमार आगलावे यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांच्या दृष्टीने तो तडीपार होता, मात्र रविवारी रात्री वाद घालून खून केला. याचाच अर्थ खोलापुरी गेट पेालिसांचा आरोपींवर किती वचक आहे, हे यावरून दिसून येते.