आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aney Separate Vidarbh Through Cutting Maharashtra Cake

VIDEO: महाराष्ट्राचा केक कापून अणेंकडून विदर्भ वेगळा, राज ठाकरेंचा गर्भीत इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी नागपुरातील रविभवन येथे काही माेजक्या लाेकांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या अाकाराचा केक कापून त्यातून विदर्भाचा भाग वेगळा काढला हाेता. - Divya Marathi
माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी नागपुरातील रविभवन येथे काही माेजक्या लाेकांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या अाकाराचा केक कापून त्यातून विदर्भाचा भाग वेगळा काढला हाेता.
नागपूर - विदर्भाच्या मुद्द्यावर महाधिवक्तापदाचा राजीनामा देणारे विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी बुधवारी नागपुरात आपला वाढदिवस साजरा करताना महाराष्ट्राच्या आकाराचा केक कापून त्यातून विदर्भ आणि मराठवाडा वेगळे करीत असल्याचे दाखवून दिले. दरम्यान, त्यांच्या या कृतीवर प्रतिक्रिया देताना मनसेप्रमुख राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे अणेंना इशारा दिला अाहे.

अॅड. अणे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून वेगवेगळ्या जिल्ह्यांत जाहीर सभा घेत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांच्या विदर्भवादी भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली होती. महाराष्ट्राचे चार भागही होऊ शकतात, अशी भूमिका वैद्य यांनी मांडली होती. त्यावर महाराष्ट्र म्हणजे वाढदिवसाचा केक नाही, या शब्दांत राज ठाकरे यांनी वैद्य यांच्या भूमिकेचा समाचार घेतला होता. तसेच अणेंवरही टीका केली हाेती.
बुधवारी अणे यांचा वाढदिवस होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री त्यांनी नागपुरातील रविभवनात कुटुंबीय तसेच सहकाऱ्यांसमवेत केक कापला. त्यावर महाराष्ट्रातील वेगवेगळे प्रदेश दर्शवण्यात आले होते. महाराष्ट्राच्या आकाराच्या केकमधून त्यांनी विदर्भ व मराठवाडा वेगळे करीत राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. वाढदिवसाचा हा कौटुंबिक कार्यक्रम होता. त्यामुळे त्याचा राजकीय अर्थ काढू नका, असे अणे यांनी स्पष्ट केले.

पुढे वाचा.. यावर राज ठाकरे म्हणाले- अणे हा वाढदिवस अायुष्यभर लक्षात ठेवतील... अणेंनी केक कटींग करताना मराठवाड्याचा काही भागही जोडला विदर्भाला.... अखंड महाराष्ट्राचा प्रस्ताव विधान परिषदेत टळला....