आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानधनात वाढीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती​ - अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढीसह अन्य प्रलंबित न्याय्य मागण्या निकाली काढण्यासाठी आयटक, संघर्ष कृती समितीने ११ सप्टेंबरपासून अंगणवाडी कर्मचारी महिलांनी बेमुदत संप पुकारला. कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी १५ सप्टेंबरला पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केले. या वेळी त्यांनी घोषणा देत शासनाचा निषेध केला. 
 
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी वर्षभर आंदोलन केलीत, परंतु राज्य सरकारने याची दखल घेतल्याने संघटनेने आक्रमक पवित्रा घेत ११ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. 

मानधनात वाढ अन्य मागण्यांसाठी पं. स. समोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत घोषणा दिल्या. या वेळी संघटना अध्यक्ष ममता सुंदरकर, मीना वऱ्हाडे, शालिनी देवतारे, वनमाला टिकले, वेणू राऊत, उषा पाचघरे, शालिनी खाकसे, माला वडनेरे, लता पारवे आदींसह तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्या. सरकारने अंत पाहू नये, अल्प मानधनात काम करताे, त्याचा मोबदलाही वेळेवर मिळत नाही. सरकारने आश्वासने दिलीत, परंतु आमची लढाई आम्हीच लढणार असा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. 
 
बातम्या आणखी आहेत...