आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेसहा हजार अंगणवाडी कर्मचारी संपावर, मानधनवाढीचा शासन आदेश काढेपर्यंत बेमुदत संप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील साडेसहा हजार अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप आरंभला आहे. ग्रामीण भागातील हजार ७०० तर शहरी प्रकल्पातील ७०० कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील अंगणवाडी केंद्र ओस पडल्याचे दिसून येत आहे. 
 
मानधन वाढीसह अन्य प्रलंबित मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या (आयटक) नेतृत्वात स्थानिक नेहरु मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. नेहरू मैदान, जयस्तंभ चौक, रेल्वेस्थानक चौक, हमालपुरा, काँग्रेसनगर मार्गाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. संयुक्त कृती समितीच्या वतीने जानेवारी २०१६ पासून जुलै २०१७ दरम्यान विधी मंडळावर मोर्चे, वर्षभर आंदोलन करीत मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. आंदोलनाची दखल घेत कर्मचाऱ्यांना दरवर्षी मानधनवाढ देता येईल याचा विचार करुन शिफारस करण्याकरिता २० जून १७ रोजी शासन कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती गठीत केली. सेवा ज्येष्ठता शिक्षणाधारीत संबंधिच्या शिफारसी मार्च १७ रोजी शासनाला सादर करण्यात आल्या. 
 
यावेळी ममता सुंदरकर, मिरा कैथवास, माया पिसाळकर, रेखा नवरंगे, प्रमिला राव, सुमित्रा हिवराळे, प्रमिला चिखलकर, आशा टेहरे, रत्नमाला ब्राह्मणे, मीना वऱ्हाडे, वृषाली तापस, शालु उकर्डे, रेखा ठाकूर, उज्ज्वला गुळांदे, रंजना धोटे, वंदना भोपसे, राज्यकन्या रहाटे, सुनिता सोनपराते, संध्या कापसे, माया टेंभुर्णे, माधुरी देशमुख, प्रमिला भांबुरकर, जयश्री अंबुलकर, रमा प्रभे, निर्मला सुने, ललीता पखान, साधना काळे, आरीफ जहाँ, सुभद्रा भोयर, नलीनी पवार, रजनी इंदूरकर, कमल थोरात, संगीता लकडे यांच्यासह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनिस सहभागी झाल्या. 
 
प्रकल्प कार्यालयावर ‘सीटू’चे धरणे आंदोलन : एकात्मिकबाल विकास सेवा योजना शहरी प्रकल्प अधिकारी कार्यालयावर अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या (सिटू) वतीने अंगणवाडी सेविका मदतनिस यांनी धरणे दिले. शहरी प्रकल्पातील अंगणवाड्या बंद ठेऊन कर्मचारी संपात सहभागी झाल्या आहेत. अंगणवाडी सेविकांना देशातील अन्य राज्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात आला. तेलंगणा राज्यात १० हजार ५०० रुपये, केरळमध्ये १० हजार मानधन दिले जाते. मात्र राज्यात सेविकेला हजार रुपये तर मदतनिसला २५०० रुपये असे तुटपुंजे मानधन दिल्या जाते. शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात संयुक्त कृती समितीच्या वतीने हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. 

राज्यात विशेषत: आदिवासी भागात बालमृत्यू कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. एकात्मिक बाल विकास विकास सेवा योजने मार्फत सहा महिने ते वर्ष वयोगटातील बालकांना टीएचआर दिला जातो, तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा असतो, असे एका सर्वेक्षणानुसार बालकांनी टीएचआर खाण्याचे प्रमाण टक्के असून, बाकीचा फेकून दिल्या जात असल्याचे आढळून आले आहे. मानधन वाढ, अंगणवाडी केंद्राचे भाडे, जानेवारी २०१७ पासून पोषण आहाराची रक्कम देण्यात आली नसल्याचे निवेदनात नमूद आहे. यावेळी अध्यक्ष रमेश सोनुले, पद्मा गजभिये, प्रतिभा शिंदे, सफीया खान, चित्रा बोरकर, चंदा चव्हाण, सुनिता भोवते, मनोरमा राऊत, आशा वैद्य, मिना कापसे, शोभा गवळी, शालिनी रत्नपारखी, वहिदा कलाम, वंदना ठाकुर, रेहना यासमिन, आशा हमजादे, वनिता किल्लेदार, अरुणा नितनवरे, हेमलता बोरकर यांच्यासह शहरासह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका कर्मचारी याांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
प्रकल्प कार्यालयावर ‘सीटू’चे धरणे आंदोलन 
एकात्मिक बाल विकास सेवा योजना शहरी प्रकल्प अधिकारी कार्यालयावर अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी धरणे दिले. शहरी प्रकल्पातील अंगणवाड्या बंद ठेऊन कर्मचारी संपात सहभागी झाल्या आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...