यवतमाळ - जिल्ह्यातील अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने दि. ११ सप्टेंबरपासून संप पुकारण्यात आला. दरम्यान, आज, दि. १६ सप्टेंबर रोजी संपकर्त्यां अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह मदतनिसांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. जिल्हा परिषदेच्या प्रवेशव्दारासमोर शासन, तसेच प्रशासनाविरोधात नारेबाजी केली. तद्नंतर निवेदन सादर केले.
राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना पाच हजार, तर मदतनिसांना केवळ अडीच हजार रूपये मानधन देण्यात येते. यात वाढ करावी, अशी मागणी गेल्या कित्येक महिन्यापासून राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात अद्याप कुठल्याही प्रकारे निर्णय घेण्यात आला नाही. त्यानंतर आश्वासन देऊनही काम केले नाही. या प्रकारामुळे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने दि. ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात आले. त्यानंतर आज, दि. १६ सप्टेंबर रोजी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यात दिलीप उटाणे, उषा डंभारे, गुलाबराव उमरतकर, गया सावरकर, विजया जाधव, निर्मला मोहरकर, रेखा लांडे, प्रमिला मलकापूरे, ललीत बोडखे, अनिता विधाते, सविता कट्यारमल, बेबी मोडक, वैजंती डंभारे, रमा गजभार, पार्बता मोहुर्ले, वंदना पिंपळे, पुष्पा गजभिये, कांता मोरे, छाया दांडेकर, पल्लवी रामटेके, सब्बा शेख, अलका तोडसाम, मिना नेवसे सहभागी झाले.
पाच टक्के टीएचआर चा होतो वापर
आदिवासी विभागात बाल मृत्यू कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. राज्यात एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत महिने ते वर्ष वयोगटातील बालकांना टिएचआर दिला जातो. एका सर्वेक्षणानुसार टिएचआर खान्याचे प्रमाण केवळ टक्के असून, बाकीचा टिएचआर फेकून दिल्या जातो.