नागपूर- जंगलात तेंदूपत्ता तोडणीसाठी गेलेल्या मजुरांवर मादी अस्वलाने केलेल्या हल्ल्यात पाच ठार झाल्याची घटना शनिवारी चंद्रपूर जिल्ह्यातील आलेवाही रेल्वेस्थानकाजवळच्या जंगलात घडली. या घटनेने उडालेला संतापाचा भडका पाहता एका झुडपात लपून बसलेल्या अस्वलाला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गोळी घालून ठार मारले. घटनास्थळी ठार झालेल्यांमध्ये बिसन सोमा कुळमेथे, फारूक शेख, रंजना अंबादास राऊत यांचा समावेश आहे. गंभीर जखमी झालेल्या मीना दुधराम राऊत, कुणाल दुधराम राऊत यांचा चा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
वाघाच्या हल्ल्यात एक ठार
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील रवीअरसोडा या गावात शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यावर वाघाने केलेल्या हल्ल्यात वामन मारप्पा (५७) हे ठार झाले. यानंतर परिसरात दहशत आहे.