आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी तीन महिने मंगळवारी राहणार शहराचा पाणीपुरवठा बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आणखी दोन-तीन महिने दर मंगळवारी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने सणासुदीच्या दिवसांत पाणी ‘गरम’, अशी स्थिती अमरावतीकरांची राहणार आहे. या कालावधीत नळजोडणीसंबंधित १०० टक्के अडचणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सोडवणार असल्यामुळे उन्हाळ्यात शहरातील नागरिकांना पूर्वीप्रमाणेच पाणी मिळेल. नागरिकांच्या सोयीसाठीच आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मजीप्राचे कार्यकारी अभियंता प्रशांत भामरे यांनी दिली आहे.
शहरातील सबनिस प्लॉट, नमुना गल्ली, अंबापेठ या भागात नळासंबंधित अनेक समस्या आहेत. अशाच अडचणी इतर भागांतही आहेत, त्या आम्ही दर मंगळवारी सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यांपैकी काही अडचणी दूर झाल्या असून, काही अद्याप शिल्लक असल्याचे भामरे यांनी स्पष्ट केले.

२९ सप्टेंबरपासून दर मंगळवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा मजीप्राने निर्णय घेतला. आठवड्यातील एका दिवसाच्या (मंगळवार) ब्रेकअपमध्ये सिंभोरा येथील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७५० अश्वशक्तीच्या चार पंपांची देखभाल दुरुस्ती, उर्ध्व आणि गुरुत्व, वाहन नलिकांवरील एअर सर्व्हिसिंग व्हॉल्व्हची दुरुस्ती, उंच टाक्यांचे इनलेट आऊटलेट व्हॉल्व्ह, तसेच पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणे, अशी कामे मजीप्रातर्फे केली जातात. गेल्या मंगळवारी वडाळी येथील टाकी स्वच्छ केली. यानंतरच्या मंगळवारी व्हीएमव्ही परिसरातील टाकी स्वच्छ केली जाईल. अमरावतीत असलेल्या १६ विभागांतील नलिकांमधील घाणपाणी काढून टाकणे, एखाद्या ठिकाणी कचरा अडकला असेल तो काढणे, तपोवन येथील जल शुद्धीकरणातील फिल्टर ब्लेडची स्वच्छता, व्हॉल्व्हची देखभाल दुरुस्ती करणे, ही कामे पूर्ण करण्यासाठी मंगळवारचाच आधार असतो, असे सूत्रांनी सांगितले.

पाणी ही प्राथमिकता
आम्ही नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठीच मंगळवारी पाणीपुरवठा बंद ठेवत आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. पिण्याचे पाणी ही प्राथमिकता आहे. प्रशांतभामरे, कार्यकारी अभियंता, मजीप्रा.
बातम्या आणखी आहेत...