आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी एक जण 'एसीबी'च्या रडारवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - लाचस्विकारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे शाखेचे पीआय अनिल किनगे हवालदार दीपक खानीवाले यांना शुक्रवारी (दि. २१) अटक केल्यानंतर या प्रकरणात आणखी एका पोलिस अधिकाऱ्याचे नाव समोर आले असून एसीबी संबधित अधिकाऱ्याला चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे तो संबंधित अधिकारी कोण असा प्रश्न दबक्या आवाजात विचारला जात आहे. दरम्यान, किनगे खानीवाले यांना शनिवारी (दि. २२) न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला आहे.
किनगे खानीवाले यांनी तक्रारदार दीपक इंगोले यांना कारवाई दरम्यान घराची जप्ती टाळण्यासाठी लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम ४० हजार ठरली होती. याप्रकरणी एसीबीने शुक्रवारी पोलिस आयुक्तालयात येऊन दोघांनाही अटक केली. एसीबीकडे प्राप्त तक्रारीमध्ये किनगे, खानीवाले यांनी रक्कम मागितल्याचा उल्लेख आहे. शिवाय याच प्रकरणात अन्य एका अधिकाऱ्याचाही संबंध असून त्यालाही एसीबीकडून चौकशीसाठी बोलावले जाण्याची ही चर्चा शुक्रवारी 'ट्रॅप' झाल्यापासूनच आयुक्तालयाच्या वर्तुळात सुरू होती. दरम्यान शनिवारीसुद्धा या चर्चेने जोर धरला होता. दरम्यान, तो अधिकारी कोण, त्या अधिकाऱ्याचा या प्रकरणाशी संबध काय, यासंबंधी एसीबीच्या पथकाने माहिती काढण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी एसीबी मार्फत होण्याची शक्यता सुत्राने व्यक्त केली आहे. दुसरीकडे एसीबीकडून लवकरच किनगे खाणीवाले यांच्याविरुध्द झालेल्या कारवाईचा प्रस्ताव पोलिस आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे. या अहवालावर पोलिस आयुक्त पुढील कारवाईचा निर्णय घेणार आहे.पोलिस आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या पीआय नियुक्तीसंबंधी घेतलेला सावध पवित्रा पाहता आगामी काळात या पदावर कुणाची िनयुक्ती होते,हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
किनगे खानीवाले यांनी तक्रारदाराला वारंवार रकमेची मागणी केली असल्याचे एसीबीच्या पडताळणीमध्ये पुढे आले होते. दरम्यान १९ ऑगस्टला रक्कम घेण्याचे ठरले होते. संबंधित ४० हजार रुपयांची रक्कम कागदात गुंडाळून ठेवण्यासाठी खानीवाले यांनी इंगोले यांना कोरा कागद दिला होता. इंगोले यांनी ही कागदात गुंडाळलेली रक्कम १९ आॅक्टोबर रोजी सुमारे ४५ मिनीटे किनगे यांच्या टेबलवर ठेवली होती. त्यावेळी पंच हा किनगे यांच्या कक्षाबाहेर उभा होता. तर एसीबीची चमू पोलिस आयुक्तालात हजर होती. मात्र त्यादिवशी ही रक्कम स्विकारल्याने इंगोले यांनी ती रक्कम घेऊन परत गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...