आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचखोर EOसह लिपिकास अटक, अॅन्टी करप्शनची दर्यापुरात धडक कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर्यापूर - निलंबनकाळातील वेतनाची थकबाकी देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या येथील नगर पालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यासह एका लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी (दि. २२) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास रंगेहात अटक केली. महिनाभरात एसीबीने दुसऱ्यांदा लावलेल्या या ट्रॅपमध्ये शिक्षणाधिकारी मदनलाल चतरु राठोड (५७, रा. बंजारा नगर, अकोला ) लिपीक गजानन भाऊराव साळुंके (४८, रा. गायत्री नगर, दर्यापूर ) हे दोघे अडकल्याने खळबळ उडाली आहे.

निलंबन काळातील वेतन काढून देण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी उपरोक्त दोघांनीही तक्रारकर्त्याकडे केली होती. त्यामुळे संबंधिताने १८ आॅक्टोबर रोजी एसीबीकडे लेखी तक्रार दाखल केली होती. ठरल्याप्रमाणे बसस्थानक परिसरातील लक्ष्मीनारायण संकुलासमोरील पानटपरीच्या बाजुला तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारता ही कारवाई करण्यात आली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक महेश चिमटे, अप्पर पोलिस अधीक्षक विलास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घटक प्रमुख आर. बी. मुळे, पोलिस उपअधीक्षक जयंत राऊत, पोलिस निरीक्षक डी. एन. उराडे, राहुल तसरे, राहुल शिरे श्रीकृष्ण तालन, पुरुषाेत्तम बारड, प्रमोद धानोरकर, सुनील वऱ्हाडे आदींनी केली. रात्री उशीरपर्यंत कारवाई सुरू होती.
बातम्या आणखी आहेत...